यावेळी संस्थेचे सचिव सतीश गुगळे म्हणाले की, राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज हे सर्वधर्मीयांचे असल्यामुळे जैन समाजाबरोबर इतर समाजानेसुद्धा या महोत्सवात सहभाग नोंदविला, ही भूषणावह बाब आहे. गुरूंच्या आशीर्वादामुळे जीवनातील सर्व संकटे दूर होतात. अठाई तपसारखी कठीण साधना गुरुकृपा व श्रद्धेमुळे सहज शक्य झाली. पुढील वर्षी तालुक्यातून १०८ तपस्वी करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
स्वागत बिपीन खंडागळे यांनी केले. सुनील कटारिया यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. यावेळी खजिनदार सुरेश कुचेरिया, विश्वस्त धरमचंद गुगळे, संपतलाल गांधी, चांदमल देसरडा, डॉ. सचिन गांधी, डॉ. अभय भंडारी, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुभाष चोरडिया, आनंदकुमार चोरडिया, आदींसह शिक्षक उपस्थित होते. तपस्वीच्या वतीने योगेश बोरा यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
-------
फोटो - २४तपश्वी
राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज यांच्या १२१ व्या जन्मोत्सवानिमित्त अठाई तप महोत्सवात तालुक्यातील १० तपस्वी सहभागी झाले होते.