शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
4
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
5
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
6
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
7
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
8
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
9
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
11
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
12
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
14
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
15
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
16
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
17
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
18
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
19
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
20
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पडळकरांमुळे टीका-टिप्पणीचा दर्जा खालावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:15 IST

जामखेड : आमदार रोहित पवार हे आपल्या कार्यपद्धतीने राज्यातील युवकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. हीच सल भाजप आमदार गोपीचंद ...

जामखेड : आमदार रोहित पवार हे आपल्या कार्यपद्धतीने राज्यातील युवकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. हीच सल भाजप आमदार

गोपीचंद पडळकर यांना असावी. त्यामुळेच स्वतःचे कार्यक्षेत्र, जबाबदाऱ्या सोडून उचापती करत फिरत आहेत. पडळकरांनीच आतापर्यंत तीन पक्ष बदलले. ज्यांचे नेतृत्व मान्य केले त्यांच्यावरच शिवराळ भाषेत टीका केली. पडळकरांसारख्या प्रवृत्तींमुळेच राजकारणातील टीका-टिप्पणीचा दर्जा खालावला, अशी टीका पंचायत समितीचे माजी सभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे जामखेड तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे यांनी केली.

पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर केलेल्या टीकेला वारे यांनी उत्तर दिले. वारे म्हणाले, कर्जत-जामखेडची गेली ३० वर्षे तुमच्या पक्षाकडेच सत्ता होती. तुमच्या नेतृत्वाला या परिसराचा विकास करता आला नाही. मात्र आमदार पवारांकडून वर्षभरातच विकासाच्या इतक्या अपेक्षा बाळगता. असो, त्याही अपेक्षांवर रोहित पवार वर्षातच पात्र ठरले आहेत. ते राज्यभर फिरत असले तरी त्यांनी विकासगंगा मतदारसंघात आणली. हे कर्जत-जामखेडच्या जनतेला माहिती आहे.

राहिला प्रश्न केंद्र आणि राज्य सरकारांच्या निर्णयांवर भूमिका व्यक्त करण्याचा तर त्यांचं आकलन सर्वसमावेशक आहे. त्यामुळे असभ्य भाषा वापरून सर्वांचे लक्ष खेचून घेण्याचे उद्योग पडळकरांनी बंद करावेत, अशी टीका वारे यांनी केली.