कौटुंबिक न्यायालयातील ८७६ पैकी ७०५ प्रकरणे समुपदेशनातून निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:27 IST2021-09-07T04:27:08+5:302021-09-07T04:27:08+5:30
२५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक न्यायालयाच्या पार्श्वभूमीवर नगरच्या कौटुंबिक न्यायालयात शहर वकील संघटना व सेंट्रल बार असोसिएशनच्या वतीने ...

कौटुंबिक न्यायालयातील ८७६ पैकी ७०५ प्रकरणे समुपदेशनातून निकाली
२५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक न्यायालयाच्या पार्श्वभूमीवर नगरच्या कौटुंबिक न्यायालयात शहर वकील संघटना व सेंट्रल बार असोसिएशनच्या वतीने मध्यस्थी प्रक्रियेबाबत जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. भूषण बऱ्हाटे, ॲड. सुभाष भोर, ॲड. नीलमणी गांधी व ॲड. प्रज्ञा हेंद्रे, कौटुंबिक न्यायालयाचे अधीक्षक नवाझ शेख, समुपदेशक सुषमा बिडवे, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, ॲड. शिवाजी कराळे, महिला सचिव ॲड. मीनाक्षी कराळे आदी उपस्थित होते.
यावेळी भूषण बऱ्हाटे म्हणाले, येत्या ९ सप्टेंबरला सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात न्यायालयात खटले प्रलंबित आहेत. त्या निकाली काढण्यासाठी जास्तीत जास्त पक्षकारांनी या लोक अदालतचा लाभ घ्यावा. यावेळी ॲड. भोर यांनी मध्यस्थीचे नियम व फायदे यासंदर्भात मार्गदर्शन केले. ॲड. गांधी यांनी मध्यस्थीचे तत्त्व व जागरूकता याविषयावर भाष्य केले. ॲड. हेंद्रे यांनी महत्त्व सांगितले, समुपदेशक सुषमा बिडवे यांनी समुपदेशन कामाची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. अभय राजे यांनी केले. ॲड. सागर पादीर यांनी आभार मानले. यावेळी ॲड. अनुराधा येवले, ॲड. सुनील तोडकर, ॲड. राजेश कावरे, राजेंद्र सेलोत, ॲड. अनिता राशिनकर, ॲड. अनिता दिघे, ॲड. वृषाली तांदळे, ॲड. पल्लवी पाटील, ॲड. प्रज्ञा उजागरे आदी उपस्थित होते.
-----------------------------------
फोटो ०६ कोर्ट
ओळी-
नगरच्या कौटुंबिक न्यायालयात मध्यस्थी प्रक्रियेबाबत जागरूकता या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना न्यायाधीश नेत्रा कंक. समवेत ॲड. भूषण बऱ्हाटे, ॲड. सुभाष भोर, ॲड. नीलमणी गांधी, ॲड. प्रज्ञा हेंद्रे, सुषमा बिडवे, ॲड. अभय राजे आदी.