..अन्यथा आमदारांच्या घरासमोर बेमुदत मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:33 IST2021-02-23T04:33:08+5:302021-02-23T04:33:08+5:30

शेवगाव : शेतकरी अनुदान त्वरित अदा करावे, श्रावणबाळ निवृत्ती वेतन, संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी निवृत्तीवेतन, वृद्धापकाळ निवृत्ती वेतन ...

..Otherly indefinite stay in front of MLA's house | ..अन्यथा आमदारांच्या घरासमोर बेमुदत मुक्काम

..अन्यथा आमदारांच्या घरासमोर बेमुदत मुक्काम

शेवगाव : शेतकरी अनुदान त्वरित अदा करावे, श्रावणबाळ निवृत्ती वेतन, संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी निवृत्तीवेतन, वृद्धापकाळ निवृत्ती वेतन आदी योजना तत्काळ कमिटी स्थापन करून लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा, अन्यथा या सर्व कमिटीचे अध्यक्ष असलेल्या आमदार मोनिका राजळे यांच्या घरासमोर निदर्शने करून सर्व वंचित लाभार्थ्यांना घेऊन बेमुदत मुक्काम आंदोलन केले जाईल, असा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव ॲड. सुभाष लांडे यांनी दिला आहे.

विविध मागण्यांचे निवेदन सोमवारी सकाळी शेवगावच्या तहसीलदारांना देण्यात आले आहे. यावेळी कॉम्रेड संजय नांगरे, वैभव शिंदे, भगवान गायकवाड, बापूराव राशीनकर, अशोक नजन, आत्माराम मगर, विश्वास हिवाळे आदींसह योजनांपासून वंचित राहिलेल्या काही नागरिकांच्या सह्या आहेत.

Web Title: ..Otherly indefinite stay in front of MLA's house