शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच प्रश्न सोडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:22 IST

श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातील पिंपळगाव जोगे धरणाची उंची वाढविणे, डिंभे-माणिकडोह बोगद्याचे काम आणि घोड धरणातील गाळ काढणे, पश्चिम घाटमाथ्यावरून ...

श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातील पिंपळगाव जोगे धरणाची उंची वाढविणे, डिंभे-माणिकडोह बोगद्याचे काम आणि घोड धरणातील गाळ काढणे, पश्चिम घाटमाथ्यावरून वाहून जाणारे पाणी अडविणे यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सखोल चर्चा करून अधिकाऱ्यांना योग्य सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कुकडीचा पाणीप्रश्न मार्गी लागेल, अशा विश्वास माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. शरद पवार यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे कुकडी, घोडच्या पाणीप्रश्नात योग्य वेळी लक्ष घातले आहे. आता ते सोडविण्याची ठोस भूमिका घेत आहेत. त्यामुळे आता पाणीप्रश्नावर श्रेयासाठी राजकारण अथवा प्रसिद्धी, पत्रकबाजी न करता सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातूनच सुटू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी बाळासाहेब शेलार, संजय आनंदकर उपस्थित होते.

.....

पाणीप्रश्नात व्यर्थ लुडबुड

गेल्या आठवड्यात बाबासाहेब भोस व मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना भेटलो होतो. त्यानंतर पवारांनी कुकडी लाभक्षेत्रातील आमदारांची बैठक घेतली. मात्र काहीजण विनानिमंत्रणाचे उपस्थित राहिले. ही व्यर्थ लुडबुड आहे. पवारांची पाणीप्रश्नावर बैठक झाली. बैठकीला उपस्थित असलेल्या कोणत्याच आमदाराने याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली नाही; पण काहीजण नुसतेच श्रेय घेण्यात पुढे असतात, असा टोला बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी लगावला.