कारगिल विजय दिवसानिमित्त ‘एक व्यक्ती, एक झाड’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:23 IST2021-07-27T04:23:01+5:302021-07-27T04:23:01+5:30

जामखेड : सतरा महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल जीवन झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय छात्रसेनेच्या वतीने जामखेडमध्ये कारगिल विजय ...

'One Person, One Tree' initiative on the occasion of Kargil Victory Day | कारगिल विजय दिवसानिमित्त ‘एक व्यक्ती, एक झाड’ उपक्रम

कारगिल विजय दिवसानिमित्त ‘एक व्यक्ती, एक झाड’ उपक्रम

जामखेड : सतरा महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल जीवन झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली

राष्ट्रीय छात्रसेनेच्या वतीने जामखेडमध्ये कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त एनसीसीच्या वतीने ‘एक व्यक्ती, एक झाड’ या उपक्रमाची न्यायाधीश रजनीकांत जगताप यांच्या हस्ते सोमवारी सुरुवात करण्यात आली. यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी शहीद जवानांना आदरांजली अर्पण करून मानवंदना दिली. यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, प्रा. मधुकर राळेभात, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, आरोग्य अधिकारी सुनील बोराडे, जामखेड महाविद्यालयाचे

प्राचार्य अविनाश फलके, नागेश विद्यालयाचे प्राचार्य बी. के. मडके, सीआरपीफचे गणेश भोसले, आरोग्य विभागाचे आजीनाथ गिते, एनसीसीचे अधिकारी गौतम केळकर, अनिल देडे, मयूर भोसले, रमेश बोलभट, प्रवीण उगले, आकाश डोके, ॲड. संगम पोले, हर्षल डोके, डॉ. सागर शिंदे, बजरंग डोके आदी उपस्थित होते.

----

२६ जामखेड कारगिल

जामखेड येथील न्यायाधीश निवासस्थानी वृक्षारोपण करून कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी न्यायाधीश रजनीकांत जगताप, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, मयूर भोसले व इतर.

Web Title: 'One Person, One Tree' initiative on the occasion of Kargil Victory Day