दोन दुचाकींच्या धडकेत एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:19 IST2021-05-15T04:19:39+5:302021-05-15T04:19:39+5:30
भेंडा : देवगाव (ता. नेवासा) येथे शुक्रवारी (दि.१४) सकाळी दहाच्या सुमारास मुळा कालव्याजवळ दोन दुचाकींची समोरासमाेर धडक झाली. यामध्ये ...

दोन दुचाकींच्या धडकेत एक ठार
भेंडा : देवगाव (ता. नेवासा) येथे शुक्रवारी (दि.१४) सकाळी दहाच्या सुमारास मुळा कालव्याजवळ दोन दुचाकींची समोरासमाेर धडक झाली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला.
भाऊसाहेब बबन ठोंबरे (वय ४०, रा. देवगाव, ता. नेवासा), असे अपघातातील मृताचे नाव आहे. अमोल नेटके असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास देवगाव येथील भाऊसाहेब ठोंबरे हे दुचाकीवरून (क्र. एम. एच. १७ ए. एच ४०८८) किराणा दुकानात चालले होते. समोरून येणाऱ्या विना क्रमांकाच्या दुचाकीवरून अमोल नेटके येत होते. मुळा कालव्याजवळ दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोराची धडक झाली. यात भाऊसाहेब ठोंबरे यांचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या दुचाकीवरील अमोल नेटके गंभीर जखमी झाले असून त्यांना अहमदनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कुकाणा पोलीस चौकीत अपघाताची नोंद झाली असून पोलीस कर्मचारी बी. एच. तमनर पुढील तपास करत आहेत.