सारोळा कासार सेवा सोसायटीची शंभर टक्के वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:06 IST2021-07-13T04:06:39+5:302021-07-13T04:06:39+5:30

केडगाव : नगर तालुक्यातील मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या सारोळा कासार विविध कार्यकारी सेवा सोसायटीची २०२०-२१ या आर्थिक वर्षात बँक ...

One hundred percent recovery of Sarola Kasar Seva Society | सारोळा कासार सेवा सोसायटीची शंभर टक्के वसुली

सारोळा कासार सेवा सोसायटीची शंभर टक्के वसुली

केडगाव : नगर तालुक्यातील मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या सारोळा कासार विविध कार्यकारी सेवा सोसायटीची २०२०-२१ या आर्थिक वर्षात बँक पातळीवर शंभर टक्के कर्जवसुली झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष संजय काळे, उपाध्यक्ष मनीषा कडूस यांनी दिली.

सचिव महादेव ठाणगे म्हणाले, संस्थेच्या वतीने शेतकरी सभासदांना पीक कर्ज, भुसार कर्ज, खेळते भांडवल कर्ज असे विविध प्रकारचे कर्ज वितरण मागील आर्थिक वर्षात केले होते. यावर्षी कोरोनाची परिस्थिती असतानाही संस्था आर्थिक डबघाईस येऊ नये म्हणून अध्यक्ष संजय काळे यांना सहकार क्षेत्रात असलेल्या कामाच्या अनुभवामुळे व वेळोवेळी बैठक घेऊन कर्जवसुलीसंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे संस्थेची शंभर टक्के कर्जवसुली बँक पातळीवर झाली आहे.

ही वसुली व्हावी यासाठी संस्थेचे अध्यक्ष संजय काळे, ज्येष्ठ संचालक शिक्षक नेते संजय धामणे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्ज वसुलीसंदर्भात ४ बैठका घेतल्या. त्यानुसार संचालक बाळकृष्ण धामणे, गोरक्षनाथ काळे, महेश धामणे, जयप्रकाश पाटील, बापूराव धामणे, नानासाहेब कडूस, बाळासाहेब धामणे, शिवाजी वाव्हळ, चंद्रभान जाधव, कमल कडूस आदींनी कर्जवसुलीसाठी प्रयत्न केले.

Web Title: One hundred percent recovery of Sarola Kasar Seva Society