शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा विस्कळीत करण्याचा अधिकाऱ्यांचाच खोडसाळपणा - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:25 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर: शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा जाणीवपूर्वक विस्कळीत करण्याचा खोडसाळपणा अधिकारी करत असल्याचा आरोप नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर: शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा जाणीवपूर्वक विस्कळीत करण्याचा खोडसाळपणा अधिकारी करत असल्याचा आरोप नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे यांनी सभागृहात केला तसेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्याचे यावेळी ठरले.

शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावरून महापालिकेची सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली. सभेच्या सुरुवातीला सेनेचे नगरसेवक गणेश कवडे यांनी शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला. धरण उशाला आणि कोरड घशाला, अशा शब्दात कवडे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. निर्मलनगर भागातील पाणीपुरवठा दीड महिन्यांपूर्वी सुरळीत होता, परंतु गेल्या महिनाभरापासून विस्कळीत झाला आहे. पाणीपुरवठा विस्कळीत करण्याचा खोडसाळपणा प्रशासनाकडून केला जात आहे, गंभीर आरोप विनीत पाऊलबुद्धे यांनी केला. त्यावर प्रशासनाकडून जलअभियंता परिमल निकम यांनी खुलासा केला, परंतु पाऊलबुद्धे यांचे समाधान झाले नाही. त्यांनी थातूरमातूर उत्तर देऊन सभागृहाची दिशाभूल करू नका. मागील दोन महिन्यांपासून पाणीपातळी चांगली होती. मग अचानक पाणीपातळी कमी कशी झाली. कर्मचाऱ्यांकडे विचारणा केल्यास तुम्ही इकडे येऊ नका, असे सांगितले जाते. याचा अर्थ काही गडबड आहे. अधिकाऱ्यांकडून लपवाछपवी सुरू आहे. औरंगाबाद रोडवरील अनधिकृत नळकनेक्शन तोडण्याबाबत चर्चा झाली होती. परंतु दीड महिना उलटूनही त्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत बैठक होऊन निर्णय होत नसेल तर हा आमदारांचा अवमान आहे, असे पाऊलबुद्धे म्हणाले. अन्य सदस्यांनी उभे राहत जाणीवपूर्वक अधिकारी पाणीपुरवठा विस्कळीत करत असल्याचे सांगत कारवाईची मागणी केली. यावेळी झालेल्या चर्चेत, रवींद्र बारस्कर, सभापती अविनाश घुले, अनिल शिंदे, कुमार वाकळे आदींनी सहभाग घेतला.

....

११२ नळ अनधिकृत

सध्या उड्डाणपुलाखालील जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना ११२ नळकनेक्शन अनधिकृत असल्याची बाब सभापती अविनाश घुले यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. यावरून शहरातील अनधिकृत नळ कनेक्शनचा शोध घेऊन पाणीपट्टी आकारणीची मागणी अनिल शिंदे यांनी केली.

......

जुन्या इमारतींचे परवाने तुम्हीच शोधून द्या

स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर यांनी केडगाव येथील अनधिकृत इमारत धारकांना दिलेल्या नोटिसींचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. ग्रामपंचायत असताना पुणे रोडवर दुकाने बांधली गेली. त्यांना आता नोटिसा पाठविण्यात आल्या असून, दुकानदारांचे म्हणणे प्रशासन ऐकून घेत नाही, अशी तक्रार कोतकर यांनी केली. त्यावर उपमहापौर गणेश भोसले यांनी जुने परवाने नागरिकांकडे नाहीत. ते तुम्ही शोधून द्या त्यानंतर कारवाई करा, असा आदेश दिला.

....