महसूलमंत्री थोरात यांच्यावर फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:19 IST2021-05-15T04:19:55+5:302021-05-15T04:19:55+5:30
अविनाश हौशिराम भोर (रा. चैतन्यनगर, संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याविरोधात काँग्रेस कार्यकर्ते सिद्धेश विनोद घाडगे ...

महसूलमंत्री थोरात यांच्यावर फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट
अविनाश हौशिराम भोर (रा. चैतन्यनगर, संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याविरोधात काँग्रेस कार्यकर्ते सिद्धेश विनोद घाडगे (रा. खंडोबा गल्ली, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अविनाश भोर याने त्याच्या फेसबुक खात्यावर महसूलमंत्री थाेरात यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली होती. ही पोस्ट थोरात यांचा अवमान करणारी असून त्यांच्या विरुद्ध व पूर्वग्रहदूषित होऊन भोर याने पोस्ट केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या बदनामीकारक पोस्टमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये रोषाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे भोर विरोधात कठोर कारवाई करावी. अन्यथा काँग्रेस कार्यकर्ते दाद मागण्यासाठी रस्त्यावर उतरतील आणि त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला कार्यकर्ते जबाबदार राहणार नाहीत, असे पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. भोर याने केलेल्या आक्षेपार्ह पोस्टच्या झेरॉक्स काढून घाडगे यांनी पोलिसांना दिल्या आहेत. अधिक तपास हेड कॉस्टेबल गोरे करीत आहेत.