शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
2
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
3
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
4
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
5
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
6
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
7
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
8
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
9
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
10
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
11
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
12
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
13
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
14
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
15
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
16
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
17
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
18
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
19
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
20
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याची रुग्णसंख्या एक हजाराच्या खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:16 IST

अहमदनगर : दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील दैनंदिन रुग्णसंख्या प्रथमच एक हजारांच्या खाली आली आहे. जिल्ह्यात सोमवारी फक्त ९१२ रुग्ण कोरोनाबाधित ...

अहमदनगर : दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील दैनंदिन रुग्णसंख्या प्रथमच एक हजारांच्या खाली आली आहे. जिल्ह्यात सोमवारी फक्त ९१२ रुग्ण कोरोनाबाधित झाले. गत आठवडाभराचा जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट हा ९.४६ टक्के इतका खाली आला असून त्यामुळे प्रशासन व नागरिकांचाही जीव भांड्यात पडला आहे.

गत आठवड्यातील एकूण चाचण्यांपैकी पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण हे ८.४६ टक्के इतके असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले. सोमवारी दुपारी संपलेल्या २४ तासांत १८ हजार ४०० इतक्या चाचण्या झाल्या होत्या, त्यापैकी फक्त ९१२ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे एका दिवसाचा पॉझिटिव्ह रेट हा ४.८५ टक्के इतका कमी झाला आहे. गत महिन्यात तो ४२ टक्क्यांपर्यंत होता.

जिल्ह्यात सोमवारी १,८४६ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४८ हजार ३३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.६२ टक्के इतके झाले आहे. रुग्णसंख्येत ९१२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी झाली असून, ती आता १० हजार ८८४ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २२३, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३५९ आणि अँटिजन चाचणीत ३३० रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये अहमदनगर (४५), राहाता (४२), संगमनेर (१३७), श्रीरामपूर (७०), नेवासे (८१), नगर तालुका (६३), पाथर्डी (३९), अकोले (५७), कोपरगाव (२६), कर्जत (२६), पारनेर (५९), राहुरी (४०), भिंगार (२), शेवगाव (७८), जामखेड (४९), श्रीगोंदा (५५), इतर दिल्हा (१२), इतर राज्य (३२) असे एकूण ९१२ रुग्ण आढळून आले. दरम्यान, २४ तासांत ४५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली आहे.

---

कोरोना स्थिती

बरे झालेली रुग्णसंख्या :२,४८,०३३

उपचार सुरू असलेले रुग्ण : १०,८८४

मृत्यू : ३,२१८

एकूण रुग्णसंख्या:२,६२,१३५