आता घरोघरी जाऊन भाजीची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:20 IST2021-04-16T04:20:45+5:302021-04-16T04:20:45+5:30

अहमदनगर : कोरोना संसर्ग वाढत असल्याने शहरातील भाजीविक्रेत्यांनी गर्दी न करता घरोघरी जाऊन भाजीची विक्री करावी, तसेच एकाच ठिकाणी ...

Now go door to door selling vegetables | आता घरोघरी जाऊन भाजीची विक्री

आता घरोघरी जाऊन भाजीची विक्री

अहमदनगर : कोरोना संसर्ग वाढत असल्याने शहरातील भाजीविक्रेत्यांनी गर्दी न करता घरोघरी जाऊन भाजीची विक्री करावी, तसेच एकाच ठिकाणी बसायचे असल्यास अंतर ठेवून बसावे, जेणेकरून गर्दी होणार नाही, असे आयुक्त शंकर गोरे यांनी बजावले आहे. नियमांचे पालन न केल्यास त्यांनी कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

शहर व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत; परंतु भाजी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असल्याने शहरातील भाजीबाजार भरविण्यास बंधने घालण्यात आली आहेत. त्यामुळे भाजी क्रेत्यांनी घरोघरी जाऊन भाजीपाला विकावा. त्यामुळे गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही. याशिवाय भाजीविक्रेत्यांनी एकाच ठिकाणी न बसता ठराविक अंतर ठेवून बसावे. एकाच चौकात किंवा रस्त्यावर गर्दी करू नये. त्यामुळे कोरोना संसर्ग होण्याची भीती आहे. भाजीविक्रेत्यांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन गोरे यांनी केले आहे.

....

भाजीबाजार उठविले

महापालिका कर्मचाऱ्यांची शहर व परिसरात भरलेले भाजीबाजार गुरुवारी उठविले. भाजीविक्रेत्यांची गैरसोय झाली. ग्राहकांनाही भाजी मिळाली नाही. भाजी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत असल्याने ही कारवाई करण्यात आली असून, एकाच ठिकाणी बसण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

Web Title: Now go door to door selling vegetables