दरोडा टाकून खून करणाऱ्या कुख्यात आरोपीला सासुरवाडीतून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:23 IST2021-08-26T04:23:12+5:302021-08-26T04:23:12+5:30

संतोष नंदू भोसले (वय ३०, रा. बिडकीन, ता. पैठण, औरंगाबाद), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. कलादगी हद्दीत ४ ...

Notorious accused of robbery and murder arrested from Sasurwadi | दरोडा टाकून खून करणाऱ्या कुख्यात आरोपीला सासुरवाडीतून अटक

दरोडा टाकून खून करणाऱ्या कुख्यात आरोपीला सासुरवाडीतून अटक

संतोष नंदू भोसले (वय ३०, रा. बिडकीन, ता. पैठण, औरंगाबाद), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. कलादगी हद्दीत ४ ऑगस्ट रोजी आरोपींनी दरोडा टाकला होता. या घटनेत एका मुलीचा खून झाला होता. याप्रकरणी कलादगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या घटनेनंतर कर्नाटक पोलिसांनी या टोळीतील आरोपी कुलकर्णी रामू चव्हाण (रा. बिडकीन) याला अटक केली होती. इतर आरोपी मात्र फरार होते. फरार आरोपींबाबत कर्नाटक पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना माहिती दिली होती. भोसले हा वाकोडी फाटा (ता. नगर) येथील त्याच्या सासुरवाडीत लपल्याची माहिती निरीक्षक कटके यांना मिळाली होती. सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे, हेड कॉस्टेबल सुनील चव्हाण, मनोहर गोसावी, संदीप घोडके, विशाल दळवी, शंकर चौधरी, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, जालिंदर माने आदींच्या पथकाने आरोपीस जेरबंद केले. आरोपी भोसले हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत गंभीर कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

..................

फोटो २५ आरोपी

Web Title: Notorious accused of robbery and murder arrested from Sasurwadi