शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
5
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
8
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
10
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
11
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
12
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
15
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
16
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
17
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
18
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
19
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
20
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
Daily Top 2Weekly Top 5

पाथर्डी तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये नव्या नेतृत्वाला कौल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:19 IST

पाथर्डी : ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यातील गावोगावी तरुणांच्या हाती सत्ता देण्यास मतदारांची उत्सुकता दिसून आली. सतत उपलब्घ होऊ शकणाऱ्या कार्यकर्त्याला ...

पाथर्डी : ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यातील गावोगावी तरुणांच्या हाती सत्ता देण्यास मतदारांची उत्सुकता दिसून आली. सतत उपलब्घ होऊ शकणाऱ्या कार्यकर्त्याला मतदारांनी प्रथम पसंती दिली. प्रस्थापितांना नाकारत गावपातळीवरील नवीन नेतृत्व उदयाला येण्यास ग्रामपंचायतीचा कौल निर्णायक ठरला.

ग्रामपंचायत ही अशी एकच संस्था आहे तेथे सात पिढ्यांच्या वैरापासून जमिनीच्या बांधाचाही मतासाठी विचार होतो. नातेगोते, भावकी, गावकी अशा विविध बाबींचा तपशीलवार अभ्यास करण्यास मतदारांचे मुक्त व्यासपीठ म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीकडे पाहिले जाते. पक्षीय राजकारणापेक्षा उमेदवाराच्या कर्तुत्वाचा सातबारा मतदारांनी पाहिला. त्यामुळे सर्व आमिषांचा मनमुराद आनंद लुटूनही काही गावांमध्ये मतदारांनी चोखंदळपणे मतदान केले.

कासारपिंपळगाव येथे आमदार मोनिका राजळे यांच्या विकासकामांना मतदारांनी साथ दिली. त्यांच्या आघाडीला पुन्हा संधी दिली. तसेच त्यांच्या गटाच्या इतर ग्रामपंचायतींमध्येही मतदारांनी त्यांना संधी दिली. कारखाना, विविध सोसायट्या आदींकडून पुरेपूर सहकार्य मिळावे यासाठी सहकारावर वर्चस्व असलेल्या राजळेंच्या शब्दाला किंमत दिली. अकोला गावात राष्ट्रवादीचे नेते ॲड. प्रताप ढाकणे यांना ग्रामपंचायत राखण्यात यश आले नाही. तालुक्याच्या राजकारणातील सतत लक्षवेधी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे नेते अर्जुनराव शिरसाट यांनाही त्यांच्याच गावात त्यांच्या विचाराचे माणसे बसवता आले नाहीत. ग्रामपंचायत निवडणुकीकडे त्यांनी फारसे लक्ष दिले नसले तरी त्यांच्या विचाराची माणसे ग्रामपंचायतीत नाहीत हे मात्र निश्चित. तालुक्यातील येळी ग्रामपंचायत राजकीयदृष्ट्या अधिक संवेदनक्षम व तालुक्याच्या पूर्व भागातील राजकीय हालचालीचे केंद्र म्हणून पाहिले जाते. गावच्या विकासाला वाहून घेत जलसंधारणाची चळवळ संपूर्ण जिल्ह्यात लोकसहभागातून यशस्वी करून युवा नेते संजय बडे यांनी सलग पाचवेळा पंचायतीची सत्ता स्वत:कडे राखत तालुक्यात राजकीय इतिहास घडविला.

प्रमुख राजकीय पक्षांनी पक्षीय चेहरा देण्याऐवजी कर्तृत्ववान उमेदवाराला संधी देण्याचे धोरण अवलंबले. त्यामुळे पक्षीय बलाबल ग्रामपंचायत निवडणुकीतील स्पष्ट होऊ शकत नाही. तालुक्यातील १०७ पैकी ७८ ग्रामपंचायतींच्या निवडणूका अत्यंत चुरशीने झाल्या.

------

ग्रामीण भागाचा चेहरा बदलणार..

नवीन सरपंच व उपसरपंच निवडले गेले. बहुतांशी ठिकाणी तरुण व सुशिक्षित सरपंच व उपसरपंच निवडून आल्याने आता खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाचा चेहरा बदलण्यास सुरुवात होणार आहे. या निवडणूक निकालावरून नेत्यांना बोध घेऊन आगामी बाजार समिती, नगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद या निवडणुकांची व्यूहरचना करावी लागणार आहे.