शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

नेवाशाचा स्त्री जन्मदर ९८०

By admin | Updated: October 7, 2014 23:42 IST

अहमदनगर : जिल्हा परिषदेचा महिला बालकल्याण विभाग व आरोग्य विभागाने केलेल्या सांघिक कामगिरीमुळे जिल्ह्याचा स्त्री जन्मदर ९१८ वर पोहचला आहे.

अहमदनगर : जिल्हा परिषदेचा महिला बालकल्याण विभाग व आरोग्य विभागाने केलेल्या सांघिक कामगिरीमुळे जिल्ह्याचा स्त्री जन्मदर ९१८ वर पोहचला आहे. उल्लेखनीय म्हणजे नेवासा तालुक्यात हा जन्मदर ९८० वर पोहचला असून अकोले सारख्या मागास आदिवासी तालुक्यात स्त्री जन्मदर हा ९६५ पर्यंत पोहचला असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली. असे असतांना पाच तालुक्यात हा दर ९०० च्या खाली असून यात श्रीरामपूर तालुक्यात सर्वात कमी ८४६ आहे. अहमदनगर जिल्हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातो. मात्र, याच जिल्ह्यात २००९ पर्यंत स्त्री पुरूष जन्म दरात स्त्री जन्मदराचे प्रमाण ८२८ पर्यंत होते. त्यावेळी स्त्री जन्मदर वाढविण्यासाठी महिला बालकल्याण विभागाने विविध उपाययोजना आखण्यास सुरूवात केली. तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पावडे यांनी आरोग्य विभागाची साथ घेत नावीन्यपूर्ण योजना आखण्यास सुरूवात केली.सुकन्या योजना सुरू होण्यापूर्वी नगर जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या मदतीने जन्माला येणाऱ्या मुलींच्या नावावर ५ ते १० हजार रुपयांची मुदत ठेव पावती करण्यास सुरूवात केली. जिल्ह्यात सध्या ७४२ ग्रामपंचायतीत ही योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाकडून ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या दहा टक्के सेस फंडातून यासाठी तरतूद करण्यास सांगण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी अंगणवाडीतील मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. यात बालवाडीत येणाऱ्या मुलांना केवळ आहार न देता, त्यांना प्राथमिक ज्ञान देण्यात येत आहे. यासाठी पुस्तिका तयार करण्यात आली असून त्यानुसार कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात ५ हजार ३२२ अंगणवाडी सेविका, ५ हजार मदतनीस आणि ३ हजार आशा सेविकांच्या मदतीने हा कार्यक्रम राबविला जात आहे. (प्रतिनिधी)