वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:21 IST2021-07-29T04:21:48+5:302021-07-29T04:21:48+5:30

बोल्हेगाव येथे राघवेंद्रस्वामी मंदिर परिसरात नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्ट संचलित श्री राघवेंद्रस्वामी विद्यानिकेतन प्राथमिक शाळा व देवेंद्रनाथ विद्यालय ...

The need for tree planting and arboriculture time | वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन काळाची गरज

वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन काळाची गरज

बोल्हेगाव येथे राघवेंद्रस्वामी मंदिर परिसरात नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्ट संचलित श्री राघवेंद्रस्वामी विद्यानिकेतन प्राथमिक शाळा व देवेंद्रनाथ विद्यालय यांच्या वतीने कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी महापौर शेंडगे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक व संस्थेचे खजिनदार मदन आढाव होते. कार्यक्रमासाठी युवासेनाप्रमुख विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक सचिन शिंदे, दत्ता सप्रे, नीलेश भाकरे, आकाश कातोरे, अंबादास शिंदे, रावसाहेब म्हस्के, शहर जिल्हाध्यक्ष पारुनाथ ढोकळे उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक अमोल शिंदे यांनी केले. आढाव यांनी महापौर यांना बोल्हेगाव परिसर, तसेच विद्यालयामध्ये आवश्यक असणाऱ्या विविध बाबींची महापौर निधीमधून पूर्तता करण्यासंदर्भात मागणी केली. राठोड यांनी आवश्यक सर्व निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याबाबत आश्वासन दिले. सूत्रसंचालन किरण डहाणे व नियोजन वैशाली अकोलकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शुभांगी नायर, वंदना पुरनाळे, संजय सावंत, किशोर डाके, उमेश भोईटे, गणेश राजदेव, प्रवीण भोसले, चैताली कुलकर्णी यांनी प्रयत्न केले.

---------

फोटो - २८निंबळक वृक्षारोपण

महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते बोल्हेगाव येथे राघवेंद्रस्वामी मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

Web Title: The need for tree planting and arboriculture time