शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

विकास पर्वासाठी आता दबावगटाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:17 IST

अहमदनगर : नगरचे राजकारण अतिशय गढूळ झाले आहे. माजी नगराध्यक्ष नवनीतभाई बार्शीकर यांचा काळ नगरच्या इतिहासात सुवर्णकाळ होता. बार्शीकर ...

अहमदनगर : नगरचे राजकारण अतिशय गढूळ झाले आहे. माजी नगराध्यक्ष नवनीतभाई बार्शीकर यांचा काळ नगरच्या इतिहासात सुवर्णकाळ होता. बार्शीकर यांच्या विकास पर्वाची पुनरावृत्ती करण्यासाठी नगरमध्ये एक सशक्त दबाव गट हवा आहे, अशी अपेक्षा माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी व्यक्त केली.

नवनीत विचार मंचातर्फे स्व. बार्शीकर यांच्या जयंती व जन्मशताब्दी वर्षानिमित्त मंगळवारी अभिवादन करण्यात आले. त्यावेळी निमसे बोलत होते. प्रारंभी डॉ. निमसे, विचार मंचाचे अध्यक्ष सुधीर मेहता, सुभाष मुथा यांनी बार्शीकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी इंजिनिअर अमृत मुथा, आर्किटेक्ट असोसिएशनचे अर्शद शेख, रसिक ग्रुपचे जयंत येलूलकर, जागरूक मंचाचे सुहास मुळे, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलकर्णी, सुशील शाह, जनार्दन शिरसाठ, डॉ. कमर सुरुर, श्रीमती बागडे, राजन नवले, महावीर पोखरणा, अबिद खान आदींची उपस्थिती होती.

मेहता यांनी शताब्दी समितीच्या अध्यक्षपदासाठी डॉ. निमसे यांच्या नावाची सूचना केली. त्याला मुथा यांनी अनुमोदन दिले. भाईंची उपेक्षा करणाऱ्यांना आता नगरकर कृतघ्न पालिका पुरस्कार देतील, असे सांगितले. यावेळी सर्व संस्था, संघटना एकत्र आल्या तरच भाईंची स्मृती जपण्याचा उद्देश सफल होईल. प्रत्येकाने आपल्या घरावर नवनीत नगर आणि शहरात कृतज्ञता फलक लावावेत. गौरव ग्रंथासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन सुशील शाह, श्रीराम जोशी, जनार्दन शिरसाठ, किशोर मुनोत, सायली मेहता आदींनी केले. श्रीराम जोशी यांनी आभार मानले.

--

फोटो- १३ बार्शिकर

माजी नगराध्यक्ष नवनीतभाई बार्शीकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, सुधीर मेहता आदी.