वाळू उपशाविरुद्ध राष्ट्रवादीच्या पानसरे यांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:16 IST2021-06-04T04:16:51+5:302021-06-04T04:16:51+5:30

नगराध्यक्षा अनुराधा आदिक, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल भनगडे, माजी उपाध्यक्ष रवींद्र गुलाटी, सोमनाथ गांगड, राजेंद्र पानसरे, दीपक दुग्गड, संजय ...

NCP's Pansare's fast against sand subsidence | वाळू उपशाविरुद्ध राष्ट्रवादीच्या पानसरे यांचे उपोषण

वाळू उपशाविरुद्ध राष्ट्रवादीच्या पानसरे यांचे उपोषण

नगराध्यक्षा अनुराधा आदिक, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल भनगडे, माजी उपाध्यक्ष रवींद्र गुलाटी, सोमनाथ गांगड, राजेंद्र पानसरे, दीपक दुग्गड, संजय जोशी, श्रीराम तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अशोक उपाध्ये, मर्चंटस् असोसिएशनचे संचालक सुनील गुप्ता आदींनी पानसरे यांची भेट घेतली.

शहर व तालुक्यातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, नेतेमंडळींनी भेट देत उपोषणााला पाठिंबा दिला.

अर्चना पानसरे यांनी प्रांताधिकारी अनिल पवार यांना २ जून रोजी निवेदन पत्र दिले होते. त्यामध्ये मातुलठाण येथील गोदावरी नदीपात्रातून झालेल्या वाळू उपशाची चौकशीची मागणी करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे पानसरे यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला.

विनापरवाना वाळू उपसा झाल्याने शासनाचा महसूल बुडाला आहे. बेकायदेशीर वाळू उपशाचे मोजमाप नदीपात्रात पाणी येण्यापूर्वी त्वरित करावे. बेकायदेशीर उपसा केलेल्या ठेकेदार व त्याला पाठीशी घालणाऱ्यांकडून महसूल वसूल करावा. वेळेप्रसंगी गुन्हे दाखल करावेत, ठेकेदारास पाठीशी घालणारे पोलीस अधिकारी यांचीही चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी या पानसरे यांच्या प्रमुख मागण्या आहेत.

--

फोटो - पानसरे

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा अर्चना पानसरे यांनी वाळू उपशाविरुद्ध महात्मा गांधी पुतळ्यासमोर गुरुवारी उपोषण सुरू केले.

Web Title: NCP's Pansare's fast against sand subsidence