शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

‘राष्ट्रीय संरक्षित स्मारक’ कालबाह्य

By admin | Updated: February 17, 2016 22:40 IST

रियाज सय्यद, संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावचे ‘राष्ट्रीय संरक्षित स्मारक’ कालपरत्वे अस्तित्वहीन होत चालल्याने भविष्यात इतिहासाचा हा अमूल्य ठेवा केवळ नावापुरता उरण्याची शक्यता आहे.

रियाज सय्यद, संगमनेरएकेकाळी भारत देशाच्या ६ पुरातत्वीय स्थळांमध्ये गणले गेलेले संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावचे ‘राष्ट्रीय संरक्षित स्मारक’ कालपरत्वे अस्तित्वहीन होत चालल्याने भविष्यात इतिहासाचा हा अमूल्य ठेवा केवळ नावापुरता उरण्याची शक्यता आहे. संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावाला पूर्वी ‘जरासंधनगरी’ असे म्हटले जायचे. संगमनेर शहरापासून ५ किलोमीटर अंतरावर पूर्वेला प्रवरा नदीच्या काठी वसलेल्या जोर्वे गावात इ.स.पूर्व १२०० ते १५०० या काळात ‘जोर्वे संस्कृती’ सर्वप्रथम प्रकाशात आली. सन १९५०-५१ या काळात पुणे विद्यापीठाच्या पुरातत्वशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. हसमुख धीरजलाल सांकलिया व डॉ. शांताराम भालचंद्र देव यांनी जोर्वे वसाहतीच्या उत्खननाचे मोठे धाडसी काम केले. या उत्खननात ६ तांब्याच्या कुऱ्हाडी, १ तांब्याची बांगडी व ५ मिलीमीटर व्यासाचा गारगोटीचा मणी अशा वस्तू त्यांना सापडल्या. त्यातील २ कुऱ्हाडी अर्धवट तुटलेल्या असून त्यात कथिल व तांबे या धातूंचे मिश्रण आहे. त्याचबरोबर खोदकामात मोठ्या प्रमाणावर रंगीत खापरे, काही कुंभ, वाडगे व थाळ्या मिळाल्या. राखाडी रंगाची ही खापरे भाजलेल्या तांबट मातीपासून बनवलेली आहेत. पाने व झाडांची चित्रे देखील या ठिकाणी आढळून आली. त्यानंतर महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, कर्नाटक व आंध्रप्रदेशच्या काही भागात झालेल्या उत्खननात अशाच प्रकारची खापरे सापडली. परंतु सर्वप्रथम ही खापरे जोर्वे येथे सापडल्याने ‘जोर्वे संस्कृती’ म्हणून संबोधली गेली. सापडलेली खापरे घडविलेली असून वेगवेगळे भाग चाकावर बनवून नंतर ते एकमेकांना जोडलेली, पक्कया भाजणीची, लाल गाभ्याची व खणखणीत आवाजाची आहेत. तर काही खापरे काळपट झाली आहेत. खापरांच्या लाल पृष्ठभागावर काळ्या रंगात भौमितिक आकाराचे नक्षीकाम केलेले आहे. काळवीट, पक्षी, कुत्रा आदी पशू-प्राण्यांची चित्रे त्यावर आहेत. भारतीय पुरातत्व विभागाने २२ जानेवारी १९५४ रोजी ‘जोर्वे’ तील या स्थळाला ‘राष्ट्रीय संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केले. देशातील ६ स्मारकांमध्ये ‘जोर्वे’चा समावेश होतो. परंतु जोर्वेला ‘राष्ट्रीय संरक्षित स्मारक’म्हणून दर्जा मिळाला तरी कालपरत्वे त्याकडे कुणीही फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे इतिहासाचा हा अमूल्य ठेवा सध्या अस्तित्वहीन होण्याच्या मार्गावर आहे.