मुळा कारखाना अध्यक्षपदी नानासाहेब तुवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:35 IST2021-02-05T06:35:26+5:302021-02-05T06:35:26+5:30

नेवासा : मुळा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी नानासाहेब तुवर व उपाध्यक्षपदी कडू पाटील कर्डिले यांची सर्वानुमते निवड करण्यात ...

Nanasaheb Tuvar as radish factory president | मुळा कारखाना अध्यक्षपदी नानासाहेब तुवर

मुळा कारखाना अध्यक्षपदी नानासाहेब तुवर

नेवासा : मुळा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी नानासाहेब तुवर व उपाध्यक्षपदी कडू पाटील कर्डिले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. मुळा कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक १९ जानेवारीला बिनविरोध झाली. अध्यक्षपदासाठी संचालक नीलेश पाटील यांनी नानासाहेब तुवर यांचे नाव सुचविले व त्यास संचालक बाळासाहेब गोरे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी संचालक बापूसाहेब शेटे यांनी कडू पाटील कर्डिले यांचे नाव सुचविले. संचालिका ताराबाई सुखदेव पंडित यांनी अनुमोदन दिले.

कारखान्याचे संचालक जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे मंत्रालयीन कामासाठी मुंबईत असल्याने ते या बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत.

संचालक मंडळाची बैठक संपल्यानंतर नवीन पदाधिकारी व संचालकांनी मुळा कारखान्याचे संस्थापक

माजी खासदार यशवंतराव गडाख यांची भेट घेतली.

फोटो २९ मुळा

Web Title: Nanasaheb Tuvar as radish factory president