शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

अकोले महाविद्यालयाच्या नावात नवलेवाडी नावाचा समावेश व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:22 IST

अकोले : येथील अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालय या नावात नवलेवाडी नावाचा समावेश व्हावा, अशी मागणी ...

अकोले : येथील अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालय या नावात नवलेवाडी नावाचा समावेश व्हावा, अशी मागणी नवलेवाडी ग्रामपंचायत, सरपंच व सदस्यांनी केली आहे. अकोले एज्युकेशन सोसायटी प्रशासनाला याबाबत नुकतेच पत्र देण्यात आले आहे.

१९७२ला अकोले कला व वाणिज्य महाविद्यालय निर्मितीच्या वेळी अकोले, नवलेवाडी, धुमाळवाडी एकत्र ग्रामपंचायत होती. कालांतराने नवलेवाडी स्वतंत्र ग्रामपंचायत झाली. नवलेवाडी ग्रामपंचायत हद्दीत हे महाविद्यालय येते. नवलेवाडी ग्रामपंचायतीचा विद्यमान सरपंच हे काॅलेज व्यवस्थापन समितीचे सदस्य असतात.

अकोले महाविद्यालय नवलेवाडी गावाच्या हद्दीत येत असल्याने ‘अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालय नवलेवाडी, अकोले’ असे नामकरण असावे, अशी मागणी करण्यात आली आहे. नवलेवाडी ग्रामपंचायत सदस्य मंडळाने अकोले एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकारी यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चाही केली आहे, असे नवनिर्वाचित सरपंच प्रा. विकास नवले यांनी सांगितले.

............................

नवलेवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच हे काॅलेज व्यवस्थापन समितीचे सदस्य असतात. काॅलेज नावातील बदल हा मंत्रालय पातळीवर होत असतो. त्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा. नावात बदल झाल्यावर पुणे विद्यापीठाला कळवावे लागते.

-जे.डी. आंबरे, अध्यक्ष, अकोले एज्युकेशन सोसायटी