डोक्यात लोखंडी टाॅमी मारून वेटरचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:23 IST2021-09-21T04:23:18+5:302021-09-21T04:23:18+5:30

राहुरी पोलीस ठाणे हद्दीत नगर-मनमाड राज्य महामार्गावर शरद म्हसे व पप्पू म्हसे यांच्या मालकीचे साक्षी नावाचे हाॅटेल आहे. हाॅटेलमध्ये ...

Murder of a waiter with an iron tommy in the head | डोक्यात लोखंडी टाॅमी मारून वेटरचा खून

डोक्यात लोखंडी टाॅमी मारून वेटरचा खून

राहुरी पोलीस ठाणे हद्दीत नगर-मनमाड राज्य महामार्गावर शरद म्हसे व पप्पू म्हसे यांच्या मालकीचे साक्षी नावाचे हाॅटेल आहे. हाॅटेलमध्ये एकूण चार तरुण वेटर म्हणून कामाला होते. त्यापैकी मयत सोनू नारायण छत्री व नामदेव दराडे हे दोन वेटर रात्री हाॅटेलमध्येच झोपत असत. १८ सप्टेंबर रोजी रात्री नेहमीप्रमाणे हाॅटेल बंद झाल्यावर हाॅटेल मालक व इतर वेटर घरी निघून गेले, तर सोनू छत्री व नामदेव दराडे हे दोघे हाॅटेलमध्येच झोपले. १९ सप्टेंबर रोजी सकाळी सोनू छत्री याचा मृतदेह हाॅटेलमध्ये दिसून आला. सोनू याच्या डोक्यात लोखंडी टाॅमी मारून त्याचा निर्घृण खून केल्याचे दिसत होते, तर दुसरा वेटर नामदेव दराडे हा मात्र तेथे आढळून आला नाही. ही घटना मध्यरात्री पावणेदोन वाजण्याच्या दरम्यान घडली.

घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक डाॅ. दीपाली काळे, संदीप मिटके, राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे, सहायक पोलीस निरीक्षक शंकरसिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक नीलेशकुमार वाघ, मधुकर शिंदे, नीरज बोकिल, तुषार धाकराव यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. तसेच अहमदनगर येथील ठसेतज्ज्ञ सहायक पोलीस निरीक्षक माधुरी मदने व त्यांचे पथक रक्षक नावाच्या श्वानासह घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. मयत सोनू छत्री हा (नेपाळ येथील रहिवासी) असून तो काही वर्षांपासून हाॅटेल साक्षी येथे वेटर म्हणून काम करत होता. छत्री याचा खून नेमका कोणी व कोणत्या कारणाने केला, हे समजू शकले नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Web Title: Murder of a waiter with an iron tommy in the head