शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
2
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
3
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
4
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
5
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
6
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
7
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
8
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
9
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
10
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
11
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
12
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
13
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
14
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
15
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
16
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
17
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
19
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
20
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मनसे-भाजप युतीत प्ररप्रांतीयांची आडकाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:14 IST

अहमदनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भाजप यांच्यात युतीची चर्चा सुरू असतानाच परप्रांतीयांबाबतच्या भूमिकेत बदल केल्यास भाजप मनसेसोबत युती ...

अहमदनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भाजप यांच्यात युतीची चर्चा सुरू असतानाच परप्रांतीयांबाबतच्या भूमिकेत बदल केल्यास भाजप मनसेसोबत युती करण्याचा विचार करील, अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येथे मांडली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील शुक्रवारी नगर दौऱ्यावर आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. मनसेशी युती करण्याबाबत पाटील यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली आहे. परंतु, जोपर्यंत परप्रांतीयांबाबत मनसे भूमिका बदलणार नाही, तोपर्यंत मनसे भाजप सोबत येण्याचा विचार करणार नाही. सध्या तरी मनसेशी युती करण्याचा भाजपाचा विचार नाही. ज्या गावाला जायचे नाही, त्या गावचा रस्ता विचारायचा कशाला. परंतु, ते जर हो म्हणाले, तर मात्र त्यांच्याकडे कसे जायचे बसने की ट्रेनने ते योग्य वेळी ठरवू. भाजपची राज्यात अकरा पदाधिकाऱ्यांची समिती आहे. या समितीत युतीचा निर्णय होईल, असे पाटील म्हणाले.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, कोरोना, मराठा व ओबीसी आरक्षण आणि पूर परिस्थितीबाबत सरकार गंभीर नाही. दोन वर्षांपूर्वी ज्यावेळी कोल्हापूरला पूर आला होता. तेंव्हा देवेंद्र फडणवीस आणि आपण स्वत: पूर परिस्थितीची पाहणी करून मदत पोहोचविली. असे असताना त्यावेळी जयंत पाटील यांनी कुठे गेले पाटील, असा सवाल केला होता. आता त्यांना मी विचारतो की पूरपरिस्थितीत जयंत पाटील कुठे आहेत, असे पाटील म्हणाले.

...

पूर परिस्थितीत मुख्यमंत्री घरातच

राज्यात पावसाने थैमान घातले आहे. काही ठिकाणी पूर आलेला आहे. परंतु, राज्याचे मुख्यमंत्री ऑनलाइन बैठका घेत असून, त्यांचे मंत्रीही घरातच बसून आहेत, अशी घणाघाती टीकाही पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.