शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

निधी आमदारांना मिळतो, मग आम्हाला का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:27 IST

अहमदनगर : जिल्हा परिषद सदस्यांच्या हक्काचा असणारा निधी जिल्हा नियोजन समितीकडून देण्यास टाळाटाळ होत असताना दुसरीकडे आमदारांना मात्र भरघोस ...

अहमदनगर : जिल्हा परिषद सदस्यांच्या हक्काचा असणारा निधी जिल्हा नियोजन समितीकडून देण्यास टाळाटाळ होत असताना दुसरीकडे आमदारांना मात्र भरघोस निधी मिळतो आहे. त्यामुळे हा निधी मिळवण्याचा चंग जिल्हा परिषद सदस्य तसेच पदाधिकाऱ्यांनी बांधला असून, त्यासाठी ते पालकमंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहेत.

मंगळवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा जिल्हा परिषद सभागृहात ऑफलाइन झाली. त्या वेळी डीपीडीसी निधी मिळण्याबाबत चर्चा झाली. सभेला अध्यक्षा राजश्री घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके, सभापती काशिनाथ दाते, सुनील गडाख, उमेश परहर, मीरा शेटे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर आदींसह अधिकारी, सदस्य उपस्थित होते.

जिल्हा नियोजन समितीने कोरोनाच्या नावाखाली जिल्हा परिषदेच्या मंजूर ४०७ कोटींपैकी अवघे ५ कोटी रुपये दिले आहेत. तेही जुन्या कामाच्या दायित्वपोटीचे आहेत. जिल्हा नियोजनमध्ये जिल्हा परिषदेचे ३४ सदस्य निवडून गेलेले आहेत. तरीही त्यांना डावलले जाते व दुसरीकडे आमदारांना भरघोस निधी दिला जातो. त्यामुळे सभागृहात या निधीवरून सर्वच सदस्य व पदाधिकारी संतापले. जोपर्यंत आपला निधी मिळत नाही, तोपर्यंत आमदारांची शिफारस असलेल्या जिल्हा परिषद कामांना प्रशासकीय मंजुरी देऊ नये, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. जिल्हा परिषद सदस्यांना ६० टक्के व आमदारांना ४० टक्के निधी वाटपाचे सूत्र ठरलेले असताना त्यात परस्पर कोणी बदल केला, याचा जाब पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना विचारण्यासाठी त्यांची भेट घेण्याचे सर्वानुमते मान्य करण्यात आले.

भाजपचे राम शिंदे पालकमंत्री असताना या निधीसाठी जिल्हा परिषद न्यायालयात गेली होती. त्याप्रमाणे आताही जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजनच्या निधीसाठी न्यायालयात दाद मागावी, अशी मागणी जि. प. सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी केली. सदस्य राजेश परजणे, संदेश कार्ले, शरद नवले, सभापती गडाख, शेळके, परहर यांनीही निधीसाठी सर्वांनी एकत्र येत मार्ग काढू, असे सांगितले.

----------------

सहलीला जाण्यापेक्षा विकासकामे करा

जिल्हा परिषद प्रशासनाने अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली कोकण सहलीचे आयोजन करून त्यासाठी सेसमधून १८ लाखांची तरतूद केली आहे. या सहलीऐवजी जिल्ह्यात सौरदिवे लावा, अशी मागणी काँग्रेसचे सदस्य अजय फटांगरे यांनी केली. हाच मुद्दा पकडत भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे म्हणाले, रुग्णवाहिकेच्या डिझेलसाठी जिल्हा परिषदेकडे पैसे नाहीत, मग सहलीला पैसे कोठून आले? माजी अध्यक्षा शालिनी विखे यांनीही सहलीला विरोध करत शासनाने कोकणात पावसामुळे हाय अलर्ट जाहीर केल्याने जाऊ नका, असे सांगितले.

-------------

शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी तरतूद करू

पाथर्डी व शेवगावसह जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे २४०० जनावरे दगावली आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी तसेच जिल्ह्यात अनेक भागांत लसीकरणाअभावी जनावरे दगावत आहेत, असे शालिनी विखे म्हणाल्या. त्यावर सभापती गडाख म्हणाले, नुकसानभरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. तसेच चौदाव्या वित्त आयोगाच्या व्याजातून हा निधी दिला जाईल.

---------------

यापुढे इतिवृत्त वेळेत देऊ...

सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त सदस्यांना वेळेवर मिळत नाही, अशी तक्रार सदस्य परजणे यांनी केली. त्यावर अध्यक्षा घुले म्हणाल्या, याची दखल घेऊ व यापुढे इतिवृत्त वेळेत पाठवू. पण जिल्हा परिषद सभागृहाची ही शेवटची सर्वसाधारण सभा असल्याने पुढील इतिवृत्त पाठवण्याची वेळच येणार नाही, असे कुणीतरी सभागृहात म्हणाले. त्यावर एकच हशा पिकला.