शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

३८ प्राथमिक शाळांना पटसंख्या घटल्याचा फटका

By admin | Updated: March 22, 2024 18:58 IST

पारनेर : जिल्हा परिषदेच्या पारनेर तालुक्यातील ३८ शाळांना विद्यार्थ्यांची संख्या घटल्याचा फटका बसला असून, यामुळे ४५ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. त्यांचे सोमवारी आॅनलाईन समायोजन होणार आहे

 पारनेर : जिल्हा परिषदेच्या पारनेर तालुक्यातील ३८ शाळांना विद्यार्थ्यांची संख्या घटल्याचा फटका बसला असून, यामुळे ४५ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. त्यांचे सोमवारी आॅनलाईन समायोजन होणार आहे. पारनेर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे ३८ प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या घटली आहे. यामध्ये पारनेर शहरासह कोहकडी व इतर गावांचा समावेश आहे. इंग्रजी माध्यमांच्या वाढत्या शाळांमुळे पारनेर शहर व परिसरातील मराठी शाळांना फटका बसत आहे. पटसंख्या कमी झाल्याने सुमारे ४५ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. आता या सर्व शिक्षकांना दुसर्‍या शाळेत समायोजन करावे लागणार आहे. सोमवारी पारनेर पंचायत समिती सभागृहात पंचेचाळीस शिक्षकांचे आॅनलाईन समायोजन सभापती सुदाम पवार, उपसभापती अरुणा बेलकर, गटविकास अधिकारी किरण महाजन, सर्व सदस्य, गट शिक्षणाधिकारी के.एन. पटारे आदींच्या उपस्थितीत होणार आहे. ‘गुरूकुल’चे नेते रा.या. औटी, जयप्रकाश साठे, ऐक्य मंडळाचे दादाभाऊ कोल्हे, अंबादास काकडे, ‘सदिच्छा’चे जिल्हाध्यक्ष बापू तांबे यांनी पाठपुरावा केल्याने शिक्षकांचे आधी समायोजन व नंतर प्रशासकीय बदल्या होणार आहेत. आॅनलाईन बदल्यांमुळे शिक्षकांना कोणत्याही राजकीय पदाधिकारी किंवा अधिकार्‍यांकडे न जाता पसंतीची शाळा मिळणार आहे. (तालुका प्रतिनिधी)