कोल्हार भगवतीपूर (ता. राहाता) येथे अहमदनगर जिल्हा परिषदेच्या बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर प्राथमिक शाळा इमारत व व्यापारी संकुल इमारतीचा भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त मंगळवारी ग्रामविकास व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे एकाच मंचावर आले होते. तेथून पुढे कार्यक्रमस्थळी जाण्यास राज्यमंत्री सत्तार यांचा ताफा निघाला. यावेळी रस्त्यातच शिवसैनिकांनी राज्यमंत्री सत्तार यांचे वाहन अडवले. जय भवानी, जय शिवाजी, उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देत सत्तार यांचा रस्त्यातच सत्कार केला. त्यामुळे काही वेळ या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय शिंदे, सचिन कोते, साई तनपुरे, सुयोग सावकारे, अमर गायकवाड, प्रसाद पाटील, विश्वजित बागुल, बाळू ठाकरे, संतोष कुराडे, सचिन नेटके उपस्थित होते.
070921\img-20210907-wa0098.jpg
कोल्हार मध्ये शिवसैनिकांनीच अडविली सेना राज्यमंत्री सत्तार यांची गाडी आडवून त्यांचा सत्कार केला.