मराठा उद्योजक नगरचे कारखाने बंद ठेवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2016 00:14 IST2016-09-20T00:12:52+5:302016-09-20T00:14:49+5:30

अहमदनगर : मराठा क्रांती महा मूकमोर्चासाठी येत्या शुक्रवारी कारखाने बंद करण्याचा निर्णय सोमवारी उद्योजकांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला़

Maratha industrialist will be shutting down the factory | मराठा उद्योजक नगरचे कारखाने बंद ठेवणार

मराठा उद्योजक नगरचे कारखाने बंद ठेवणार

अहमदनगर : मराठा क्रांती महा मूकमोर्चासाठी येत्या शुक्रवारी कारखाने बंद करण्याचा निर्णय सोमवारी उद्योजकांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला़ तसेच मराठा समाजातील तरुणांना मदत करण्यासाठी दर महिन्याला बैठक घेण्याचेही यावेळी ठरले़
नागापूर औद्योगिक वसाहतीतील मराठा चेंबर्स आॅफ कॉमर्सच्या सभागृहात मराठा उद्योजकांची बैठक पार पडली़ बैठकीस औद्योगिक वसाहतील शेकडो उद्योजक उपस्थित होते़ बैठकीच्या सुरुवातीला येत्या शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती महा मूकमोर्चाची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली़ उद्योजक व कारखान्यांतील अधिकारी व कामगारांना मोर्चात सहभागी होता यावे, यासाठी शुक्रवारी दिवसभर कारखाने बंद करण्याचा निर्णय उद्योजकांच्या वतीने जाहीर करण्यात आला़ उद्योजकांच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत असून, मोर्चात कामगारांना सहभागी होता येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले़
मराठा उद्योजक आपले कारखाने बंद ठेवून मोर्चात सहभागी होणार आहेत़ एमआयडीसीत मोर्चाच्या प्रचार व प्रसारासाठी नागापूर परिसरात फ्लेक्स लावणे, रस्त्यांवरील स्वच्छता करणे, मोर्चेकऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याची तयारीही उद्योजकांनी दर्शविली आहे़ मोर्चासाठी मराठा उद्योजक एकत्र आले असून, त्यांनी भविष्यकाळात समाजासाठी विविध उपक्रम हाती घेण्याचाही निर्णय घेतला़ मराठा समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करण्यात येणार आहे़ त्यासाठी उद्योग मार्गदर्शन मेळावे घेवून तरुणांना उद्योजक होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाणार आहे़ नगरसह राज्यातील मराठा उद्योजकांनी एकत्र येऊन समाजासाठी निधीही उभा करण्याचे यावेळी ठरले़ उद्योजकांसह कामगारांनी मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार यावेळी उद्योजकांनी केला़
मराठा मुलांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र उभारणार
मराठा समाजातील तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही़ त्यामुळे तरुणांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करून परीक्षेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे़ स्पर्धा परीक्षेसाठी निधी देण्याची तयारी यावेळी उद्योजकांनी दर्शविली असून, मराठा समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील तरुण आयएएस अधिकारी कसा होईल, यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत़

Web Title: Maratha industrialist will be shutting down the factory