मंथन प्रज्ञाशोध, एनएसएसईत तनपुरेवाडी शाळेचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:15 IST2021-06-27T04:15:12+5:302021-06-27T04:15:12+5:30

विद्यार्थी शौर्य खोसे, वरद कारखिले, साई पुजारी, आलिया इनामदार, आर्या लाळगे, कार्तिक लाळगे, श्रावणी शेटे, प्रांजल लाळगे, तनया ...

Manthan Pragya Shodh, Success of Tanpurewadi School in NSSE | मंथन प्रज्ञाशोध, एनएसएसईत तनपुरेवाडी शाळेचे यश

मंथन प्रज्ञाशोध, एनएसएसईत तनपुरेवाडी शाळेचे यश

विद्यार्थी शौर्य खोसे, वरद कारखिले, साई पुजारी, आलिया इनामदार, आर्या लाळगे, कार्तिक लाळगे, श्रावणी शेटे, प्रांजल लाळगे, तनया धोंगडे, लावण्य भुकन, शर्वरी रोहकले, तन्वी सोनवणे, सई पंदारे यांनी मंथन प्रज्ञाशोध व एनएसएसई स्पर्धा परीक्षेत यश मिळविले. याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

अध्यक्षस्थानी निवृत्ती तनपुरे होते. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक मच्छिंद्र दिवसे, शिक्षिका मंगल भुकन, प्रफुल्ला मोरे, योगिनी बेलोटे, सुषमा धामणे यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सदस्य सुधामती कवाद, दिगंबर लाळगे, गणेश कवाद यांनी परिश्रम घेतले. यावेळी पारनेर तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष ठकाराम लंके, शाळा समितीचे अध्यक्ष संपत लाळगे, मळगंगा ट्रस्टचे विश्वस्त विश्वासराव शेटे, सेवा सोसायटीचे संचालक शांताराम कवाद, असीम हवालदार, दिलीप लाळगे, मंगेश लंके, निवृत्ती पानमंद, बाबाजी तनपुरे, नवनाथ लाळगे, विष्णू लंके, अशोक लाळगे, रवी काळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. समीर काळे यांनी केले. दिलीप लाळगे यांनी आभार मानले.

---

२६ तनपुरेवाडी

तनपुरेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांचा ग्रामस्थांनी सन्मान केला.

Web Title: Manthan Pragya Shodh, Success of Tanpurewadi School in NSSE