मनीषा म्हस्के हेणार चांडगावच्या सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:34 IST2021-02-05T06:34:54+5:302021-02-05T06:34:54+5:30

आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव येथे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये नऊ जागांपैकी आठ जागा जिंकून ग्रामविकास मंडळाने निर्विवाद बहुमत ...

Manisha Mhaske will be the Sarpanch of Chandgaon | मनीषा म्हस्के हेणार चांडगावच्या सरपंच

मनीषा म्हस्के हेणार चांडगावच्या सरपंच

आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव येथे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये नऊ जागांपैकी आठ जागा जिंकून ग्रामविकास मंडळाने निर्विवाद बहुमत मिळविले. आरक्षण सोडतीमध्ये सरपंचपदी सर्वसाधारण व्यक्तीचा कौल मिळाल्यानंतर विद्यमान सरपंच मनीषा म्हस्के यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

गेली पाच वर्षे केलेल्या विकासकामांच्या जोरावर अनिल म्हस्के, तुकाराम चाकणे, अरविंद भालेकर आणि रवींद्र म्हस्के यांनी ग्रामस्थांना विचारात घेऊन चांडगाव ग्रामविकास मंडळ निवडणुकीत उतरवले. जनसेवा मंडळ आणि बहुजन विकास आघाडी या दोन्ही मंडळांचा दारुण पराभव करीत ग्रामविकास मंडळाने मनीषा रवींद्र म्हस्के, रंजना मश्चिंद्र गदादे, स्वाती रमेश म्हस्के, गोरख भानुदास चाकणे, दादा राऊ रसाळ, नीलम संतोष चाकणे, निशिगंधा युवराज घोडके, मीना शोभाचंद म्हस्के अशा आठ जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळविले. विरोधी जनसेवा मंडळाचे रमेश देवीदास म्हस्के हे एकमेव सदस्य निवडून आले. सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीमध्ये सर्वसाधारण व्यक्तीला कौल मिळाल्यामुळे सरपंचपदावर पुन्हा मनीषा म्हस्के यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Web Title: Manisha Mhaske will be the Sarpanch of Chandgaon