सुसरे ग्रामपंचायतीत महिलाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:32 IST2021-02-23T04:32:04+5:302021-02-23T04:32:04+5:30

तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील सुसरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वैशाली दादासाहेब कंठाळी यांची तर जयश्री राजेंद्र उदागे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड ...

Mahilaraj in Susare Gram Panchayat | सुसरे ग्रामपंचायतीत महिलाराज

सुसरे ग्रामपंचायतीत महिलाराज

तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील सुसरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वैशाली दादासाहेब कंठाळी यांची तर जयश्री राजेंद्र उदागे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली.

निवडणूक निर्णय अधिकारी ओम दहिफळे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन सदस्यांची बैठक ग्रामपंचायत कार्यालयात झाली. सरपंचपदासाठी कंठाळी यांच्या नावाची सूचना दादासाहेब कंठाळी यांनी मांडली. उपसरपंच पदासाठीची सुचना रोहिणी मारुती मिसाळ यांनी मांडली. एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.

सविता महादेव घाडगे, मंदाबाई मोहन धस, देविदास डाके, दीपक पवार, सदाशिव कंठाळी, गणेश उदागे, रोहिणी ज्ञानेश्वर उदागे आदी सदस्य उपस्थित होते. गावपूरक, पानंद रस्ते, शेतीपूरक जोड रस्ते, नंदीनी नदी शुशोभिकरण अशी चौरस गाव विकासाची कामे करून आदर्श गाव म्हणून ख्याती होण्यासाठी काम करू, असे आश्वासन सरपंच वैशाली कंठाळी यांनी दिले. सत्ताधारी आघाडीचे नेते दादासाहेब कंठाळी यांनी आभार मानले. ग्रामसेवक बी. आर. बढे, ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Mahilaraj in Susare Gram Panchayat