शहरं
Join us  
Trending Stories
1
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
2
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
3
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
4
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
5
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
6
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
7
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
8
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
9
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
10
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
11
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
12
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
13
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
14
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
15
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
16
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
17
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
18
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
19
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
20
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव माळवीतील स्वस्त धान्य दुकानात धान्याचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:14 IST

पिंपळगाव माळवी (जि. अहमदनगर) : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील विविध कार्यकारी सोसायटीमार्फत चालविल्या जाणाऱ्या स्वस्त धान्य दुकानामध्ये वाटपासाठी ...

पिंपळगाव माळवी (जि. अहमदनगर) : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील विविध कार्यकारी सोसायटीमार्फत चालविल्या जाणाऱ्या स्वस्त धान्य दुकानामध्ये वाटपासाठी आणलेल्या गहू, तांदूळ, साखर अशा साडेतीन लाख रूपयांच्या धान्याचा अपहार केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पिंपळगाव माळवी येथे विविध कार्यकारी सोसायटीमार्फत स्वस्त धान्य दुकान चालविले जाते. या दुकानाची जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी २६ मार्च २०२१ रोजी तपासणी केली होती. त्यावेळी धान्य दुकानामध्ये कमी-अधिक प्रमाणात तफावत दिसून आली होती. त्यांनी याबाबत सोसायटीचे अध्यक्षांना नोटीस देऊन खुलासा मागविला होता. त्या अन्वये पुन्हा २० जुलै २०२१ राेजी पुरवठा निरीक्षक अहमदनगर यांनी स्वस्त धान्य दुकानातील धान्य साठा तपासला. त्यावेळी दुकानाच्या सेल्समनने ३ लाख ५६ हजार ४५४ रूपये किमतीचे गहू, तांदूळ, साखर, चना डाळ, मका, अख्खा चणा असे स्वस्त धान्य स्वत:च्या फायद्यासाठी गरजू लाभार्थ्यांना धान्य वाटप न करता कोठेतरी विक्री करून शासनाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी पुरवठा निरीक्षक महादेव कुंभार यांच्या फिर्यादीवरून स्वस्त धान्य दुकानाचा सेल्समन भाऊसाहेब भीमराव शिंदे (रा. पिंपळगाव माळवी) याच्यावर जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कणसे करत आहेत.

-----

पिंपळगाव माळवी येथील स्वस्त धान्य दुकानातील धान्य साठ्यामध्ये तफावत आढळली. या प्रकरणी अपहाराचा गुन्हा दाखल करून दुकान सील केले आहे. परंतु, गरजू नागरिकांना पर्यायी व्यवस्था करून धान्य वाटप लवकरच केले जाईल.

-उमेश पाटील, तहसीलदार, नगर

220721\img_20210722_155454.jpg

पिंपळगाव माळवी येथील सेवा सोसायटीमार्फत चालविले जाणारे स्वस्त धान्य दुकान हा अपहार प्रकरणी तहसीलदारांनी सील केले आहे.