शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
2
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
3
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
4
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
5
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
6
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
7
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
8
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
9
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
10
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
11
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
12
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
13
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
14
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
15
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
16
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
17
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
18
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
19
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
20
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जैन ओसवाल पतसंस्थेच्या क्युआर कोड सेवेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:24 IST

याप्रसंगी यावेळी चेअरमन किरण शिंगी, व्हाईस चेअरमन विनय भांड, माजी चेअरमन शैलेश मुनोत, माजी व्हाईस चेअरमन राजेंद्र गांधी, माजी ...

याप्रसंगी यावेळी चेअरमन किरण शिंगी, व्हाईस चेअरमन विनय भांड, माजी चेअरमन शैलेश मुनोत, माजी व्हाईस चेअरमन राजेंद्र गांधी, माजी नगरसेवक संजय चोपडा, प्रमोद डागा, संचालक समीर बोरा, मनोज गुंदेचा, संतोष गांधी, शैलेश गांधी, अभय पितळे, शांतीलाल गुगळे, सुवर्णा डागा, राखी मुनोत, लता कांबळे, सी. ए. विशाल गांधी, सी. ए. संकेत पोखरणा, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत भंडारी आदी उपस्थित होते.

यावेळी फिरोदिया म्हणाले, आताच्या काळात बँकिंग क्षेत्रात जलद, बिनचूक सेवेला महत्त्व आले आहे. स्पर्धा लक्षात घेऊन सर्वच आर्थिक संस्थांना बदल अंगीकारणे अनिवार्य बनले आहे. सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा यांनी स्थापन केलेली जैन ओसवाल पतसंस्थेने नेहमीच असे काळानुरुप बदल केले आहेत. त्यामुळेच बँकेच्या दर्जाची सेवा देण्यात ही पतसंस्था यशस्वी झाली आहे. क्युआर कोड सारखी सेवा सुरु करुन पतसंस्थेने आधुनिकतेच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाउल टाकले आहे.

आदेश चंगेडिया म्हणाले, जवळपास २१ वर्षांची परंपरा असलेली ही पतसंस्था उत्कृष्ट व शिस्तबद्ध कारभारासाठी नावाजली जाते. व्यापारी, व्यावसायिक तसेच सर्वच खातेदारांना चांगली बँकिंग सेवा देण्याचा सातत्याने प्रयत्न होतो.

चेअरमन किरण शिंगी म्हणाले, चेअरमन पदाची धुरा हाती घेताच पतसंस्थेच्या आधुनिक बँकिंग सेवेचा नवा अध्याय सुरु करताना खूप आनंद होत आहे. आताच्या काळात ग्राहक कॅशलेस सारख्या सुरक्षित व्यवहारांना प्राधान्य देतात. ही बाब लक्षात घेऊन पतसंस्थेने स्टेट बँकेच्या सहकार्याने क्युआर कोड सेवेचा अवलंब केला आहे. यामुळे ग्राहकांना आपल्या मोबाईलद्वारे फंड ट्रान्सफरचे व्यवहार सहज करता येणार आहेत. व्हाईस चेअरमन विनय भांड यांनी आभार मानले. (वा. प्र.)

---------

२२ गुंदेचा फोटो

सहकारमहर्षी कै. सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेची आधुनिक बँकिंग सेवेचे उदघाटन उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते झाले. समवेत पतसंस्थेचे पदाधिकारी.