आश्वासनानंतर लगड यांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:27 IST2021-08-25T04:27:13+5:302021-08-25T04:27:13+5:30

श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव, पारगाव, बेलवंडी, चिंभळा, येळपणे, पिंपरी कोलंदर या सबस्टेशनला ३३ के.व्ही.चा वीज पुरवठा या सबस्टेशनमधून उपलब्ध होण्यासाठी ...

Lagad's fast back after assurance | आश्वासनानंतर लगड यांचे उपोषण मागे

आश्वासनानंतर लगड यांचे उपोषण मागे

श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव, पारगाव, बेलवंडी, चिंभळा, येळपणे, पिंपरी कोलंदर या सबस्टेशनला ३३ के.व्ही.चा वीज पुरवठा या सबस्टेशनमधून उपलब्ध होण्यासाठी रोहित्रे खरेदी करून तातडीने काम पूर्ण व्हावे, यासाठी लगड यांच्यासह शेतकऱ्यांनी दि. २४ रोजी उपोषण केले. या ३३ के.व्ही.चे काम ८० टक्के पूर्ण झाले असून दोन रोहित्रे बसली की काम पूर्ण होऊन त्याचा फायदा संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे.

यावेळी उपोषणकर्त्यांना राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घन:श्याम शेलार यांनी भेट देऊन ऊर्जा राज्यमंत्री प्रजक्त तनपुरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या ठिकाणचे उर्वरित काम त्वरित पूर्ण करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर पंदरकर, नागवडे कारखान्याचे संचालक सचिन कदम, क़ोळगावचे उपसरपंच अमित लगड, माजी उपसरपंच नितीन नलगे, शहाजी हिरवे, राजेंद्र काकडे, रामदास झेंडे, नलगे, शरद लगड, बाबासाहेब बारगुजे, आंबर खामकर, बापू नलगे, कुलदीप कदम, बापू साके, नितीन मोहारे, मंगेश घोडके, पोपट साके, संतोष मेहत्रे, भरत काकडे, अविनाश नलगे तसेच शेतकरी आदी उपस्थित होते.

Web Title: Lagad's fast back after assurance