श्रीगोंदा खादी ग्रामोद्योग संघाच्या वार्षिक सभेत खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:23 IST2021-07-27T04:23:03+5:302021-07-27T04:23:03+5:30
श्रीगोंदा : कर्ज प्रकरण मंजूर करून देतो. त्यासाठी बारा हजार रुपये द्या. प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी पाच हजार ...

श्रीगोंदा खादी ग्रामोद्योग संघाच्या वार्षिक सभेत खडाजंगी
श्रीगोंदा : कर्ज प्रकरण मंजूर करून देतो. त्यासाठी बारा हजार रुपये द्या. प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी पाच हजार रुपये लागतात. कोरोना महामारी असताना सभासद नोंदणी केलीच कशी यावरून
श्रीगोंदा खादी ग्रामोद्योग संघाच्या सर्वसाधारण सभेत खडाजंगी झाली.
संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष शुभम घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली. माजी अध्यक्ष अंकुश शिंदे यांनी प्रश्नांचा भडिमार करत संचालक मंडळास धारेवर धरले.
यावेळी माजी अध्यक्ष भगवानराव गोरखे, पंचायत समितिचे सदस्य नानासाहेब ससाणे, कांतीलाल कोकाटे होते.
यावेळी माजी अध्यक्ष भगवानराव गोरखे, पंचायत समितीचे सदस्य नानाभाऊ ससाणे, विद्यमान संचालक नंदकुमार ससाणे, मनोज घाडगे, बापुराव गायकवाड, दत्तात्रय गोरखे यांची भाषणे झाली.
अहवाल वाचन सचिव सावंत यांनी केले. संतोष शिंदे यांनी आभार मानले.