शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय व्देषातून ‘मुळा-प्रवरा’वर घाला

By admin | Updated: September 7, 2014 23:47 IST

लोणी : राजकीय द्वेषापोटी मुळा-प्रवरासारखी एक चांगली संस्था बंद पाडण्याचे कटकारस्थान केले गेले.

लोणी : राजकीय द्वेषापोटी मुळा-प्रवरासारखी एक चांगली संस्था बंद पाडण्याचे कटकारस्थान केले गेले. कामगारांचे आणि सभासदांचे निर्माण झालेले प्रश्न शेवटपर्यंत सोडविण्याचा माझा प्रयत्न आहे. सर्व स्तरावर संघर्ष करून मुळा-प्रवरा कामगारांच्या पाठिशी उभे राहिलो म्हणूनच कामगारांच्या काही रक्कमा मिळवून देण्यात यश आले. येणाऱ्या काळातही कामगारांची पै नं पै मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.मुळा-प्रवरा वीज कामगार संघटनेच्या वतीने विखे पाटील यांचा कृतज्ञता सोहळा प्रवरानगर येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी विखे यांनी कामगारांशी संवाद साधला. संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब म्हस्के, कामगार सभेचे अध्यक्ष ज्ञानदेव आहेर, वीज कामगार संघटनेचे अध्यक्ष गोरक्ष विखे आदी उपस्थित होते.विखे म्हणाले, मुळा-प्रवरा संस्था आपले कुटुंब होते. या कुटुंबालाच धक्का लावण्याचा प्रयत्न झाला. दृष्ट लागावी असे काम या संस्थेतून सुरू होते. राजकीय द्वेषापोटी संस्था घालविण्याचा काहींना आनंद झाला. मात्र संस्था जाण्यापेक्षाही कामगारांना जो त्रास झाला याचे दु:ख अधिक आहे. केवळ काही आरोपांवरून संस्थेला आणि व्यक्तीश: आम्हाला बदनाम केले गेले. मात्र न्यायालयीन स्तरावर संस्थेच्या बाजूने लागलेल्या काही निकालांमुळे सर्व घटनाक्रम आता उघड होत चालला असल्याचे त्यांनी सांगितले.वीज नियामक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार संस्थेला दर महिन्याला एक कोटी रुपये देणे बंधनकारक असतानादेखील आज ४१ महिने होऊनही कुठलेही पैसे संस्थेला मिळाले नाहीत. आयकर संदर्भात लढलेली न्यायालयीन लढाई ही देशात एकमेव उदाहरण ठरले, असे सांगून विखे म्हणाले की, या मिळालेल्या पैशातून काही प्रमाणात कामगारांची देणी आपण देऊ केली आहेत. राज्यात अनेक सहकारी संस्था बंद पडल्या, कारखाने विकले गेले, मात्र कामगारांची देणी कोणीही दिली नाहीत. मुळा-प्रवरा हे एकमेव असे उदाहरण आहे की, संस्था बंद झाल्यानंतरही कागारांसाठी आम्ही लढत आहोत. यापुढेही प्रत्येक कामगाराला न्याय मिळेपर्यंत लढावेच लागेल.कामगारांच्या प्रश्नाचे राजकारण करून मोर्चे काढले गेले. पण कामगारांच्या प्रश्नासाठी कोणीही पुढे आले नाही. तुमच्यासाठी कोण लढत आहे याचा अंतर्मुख होऊन विचार करा, असे आवाहनही विखे यांनी केले. कामगार संघटनेच्या वतीने विखे यांना सन्मानित करण्यात आले.(वार्ताहर)