दहिगावने : शेवगाव तालुक्यातील दहिगावने गटात ठिकठिकाणी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या दहिगावने येथील शैक्षणिक संकुलात संस्थेचे सचिव माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त सैनिकांचा, गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सन्मान करण्यात आला. उपस्थितांना तंबाखूमुक्तीची शपथ दिली. यावेळी प्रशासकीय अधिकारी के. वाय. नजन, सरपंच सुभाष पवार, सेवा संस्थेचे अध्यक्ष शब्बीरभाई शेख, माजी प्राचार्य पांडुरंग जोशी, विस्ताराधिकारी प्रकाश जाधव, जहांगीर शेख, उपप्राचार्या उषा धुमाळ, पर्यवेक्षक गणपत कणसे आदींसह ग्रामस्थ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रास्ताविक प्राचार्य अशोक उगलमुगले यांनी केले. सिकंदर शेख यांनी आभार मानले.
शहरटाकळी विद्यालयात बाजार समितीचे सभापती अनिल मडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण, गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसांच्या रोख रकमेचे वितरण व वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी माजी प्राचार्य विक्रम उकिरडे, संस्था प्रतिनिधी अनिल मगर, जगन्नाथ बोडखे, कृष्णा नागे, सरपंच अलका शिंदे, रामाप्पा गिरम, मनोज घोंगडे, ज्ञानदेव खराडे, उत्तम निकाळजे, रामकृष्ण भिंगारे, राजधर शेटे, शकुंतला भोसले, पर्यवेक्षिका अंजली चिंतामण, आबासाहेब राऊत आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य संपत दसपुते यांनी केले.
भावी निमगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सरपंच आबासाहेब काळे, शहरटाकळी जिल्हा परिषद शाळेत सरपंच अलका शिंदे, मठाचीवाडी जिल्हा परिषद शाळेत सरपंच रुक्मिणी धोंडे, ढोरसडे जिल्हा परिषद शाळेत सरपंच सारिका वाघमारे, सुलतानपूर बु. माउली इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये श्रीराम महाराज चोपडे व संतोष महाराज पवार, रांजणी जिल्हा परिषद शाळेत सरपंच मनीषा घुले, दहिगावने जिल्हा परिषद शाळेत ग्रामपंचायत सदस्य कडुबाळ घुले, नरेंद्रनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ग्रामपंचायत सदस्य संजय लिंबोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.