शहरं
Join us  
Trending Stories
1
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
2
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
3
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
4
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
5
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
6
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
7
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
8
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
9
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
10
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
11
Mother's Day 2026 Wishes: जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मातृत्त्वाचा सोहळा
12
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
13
कार वापरताय? मग तुमच्या गरजेनुसार निवडा ‘हे’ विशेष ॲड-ऑन्स, वेळीच करा पैशांची बचत!
14
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
15
तामिळनाडूत सत्तेचं गणित जुळेना, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाला विलंब, चाहत्यानं स्वत: पेटवून घेतलं!
16
नवीन फोन घेतलाय? मग 'या' ५ सेटिंग्ज लगेच करा; एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान!
17
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
18
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
19
'राजा शिवाजी'ने आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी, दुसऱ्या शुक्रवारचे आकडे समोर
20
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
Daily Top 2Weekly Top 5

उभ्या बसेसवर वाढला मेंटेनन्सचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन महिन्यांपासून एसटी बस एकाच जागेवर उभ्या आहेत. त्यामुळे एकीकडे या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन महिन्यांपासून एसटी बस एकाच जागेवर उभ्या आहेत. त्यामुळे एकीकडे या बसेसचा मेंटेनन्स खर्च तर वाढला आहे, दुसरीकडे बस बंद असल्याने नगर विभागाचे दररोज ७० लाख याप्रमाणे दोन महिन्यांत सुमारे ४२ कोटींचे उत्पन्न बुडाले आहे.

सर्वच जिल्ह्यात जवळपास वर्षभरापासून कधी बसेस बंद तर कधी काही प्रमाणात सुरू राहिल्या आहेत. त्यामुळे अनेक आगारांत अनेक बस वर्षभरापासून एकाच ठिकाणी उभ्या आहेत. त्यामुळे बसवरील मेंटेनन्सचा खर्च वाढला आहे.

नगर जिल्ह्यात एसटीचे विभागीय कार्यालय असून, त्या अंतर्गत ११ आगारे आहेत. विभागात एकूण ७०० एसटी बस आहेत. मागील वर्षी मार्च २०२० मध्ये लाॅकडाऊन सुरू झाल्यापासून बस एकाच जागेवर उभ्या होत्या. पुढे मे २०२०मध्ये परप्रांतीयांना राज्य सीमेवर सोडण्यासाठी काही बस वापरल्या. नंतर जून २०२० पासून पूर्ण क्षमतेने बस सुरू झाल्या. तरीही खेडोपाडी बस सोडण्यात येत नव्हत्या. साधारण ८० टक्के फेऱ्या सुरू झाल्या होत्या.

दरम्यान, राज्यात दुसरी लाट आल्यानंतर ४ एप्रिल २०२१ पासून पुन्हा बस बंद झाल्या. तेव्हापासून म्हणजे गेल्या दोन महिन्यांपासून बस आपापल्या आगारात उभ्या आहेत. त्यामुळे एसटीचे सुमारे ४२ कोटींचे उत्पन्न या दोनच महिन्यात बुडाले आहे.

--------------

जिल्ह्यातील आगार - ११

एकूण बसेस - ७००

--------

दोन महिन्यांपासून बस नाही रस्त्यावर

मागील वर्षभरात म्हणजे जून २०२० पासून १० महिने एसटी बस कमी-अधिक प्रमाणात सुरू होत्या. दुसऱ्या लाटेनंतर म्हणजे ४ एप्रिल २०२१ पासून जिल्ह्यातील बस बंद आहेत. केवळ तालुक्यातून एक किंवा दोन बस दररोज जिल्हा ठिकाणी येतात व जातात.

----------

महिन्याला २ कोटी मेंटेनन्सवर खर्च

जिल्ह्यात ७०० बस असून, त्या आपापल्या आगारात उभ्या आहेत; परंतु त्या जागेवर उभा राहून खराब होऊ नये किंवा बॅटरी डिस्चार्च होऊ नये म्हणून दररोज काही वेळ बस चालू करून त्यांची जागा बदलली जाते, तसेच बॅटरीही चार्ज केली जाते. ॲायलिंग, तसेच इतरही काही खर्च आहे. असा एका बसवर रोज एक हजार रुपये खर्च होतो. त्यानुसार ७०० बसवर महिनाभरात सुमारे २ कोटींचा खर्च होतो.

----------

आधीच दुष्काळ...

आधीच तोट्यात असलेली एसटी कोरोनामुळे पुरती डुबली आहे. कोरोनाआधी नगर विभागात दररोज सरासरी ७० लाखांचे उत्पन्न एसटीला मिळत होते; परंतु गेल्या दोन महिन्यांत एसटी जागेेवर असल्याने या दोन महिन्यांतच सुमारे ४२ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. शिवाय मागील वर्षभरातही प्रवाशांअभावी खूप कमी फेऱ्या एसटीला कराव्या लागल्या. त्यातही कोट्यवधींचे नुकसान झाले.

--------

कोरोनामुळे सध्या सर्व एसटी बस बंद आहेत. तालुक्यातून जिल्हा ठिकाणी तुरळक गाड्या सुरू असतात. नगर विभागाचे दररोजचे सरासरी ७० लाखांचे उत्पन्न असते. बस बंद असल्याने ते ७० लाखांचे उत्पन्न बुडत आहे.

- विजय गीते, विभागीय नियंत्रक, अहमदनगर.

--------

फोटो - ०२तारकपूर डेपो

नगर शहरातील तारकपूर आगारात उभ्या असलेल्या एसटी बस.