शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळाच्या बसेसच्या मेंटेनन्सचा वाढला ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:26 IST

कोपरगाव : अगोदरच नगर जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांची वाट लागलेली आहे. त्यातच पावसाळ्यामुळे अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. या ...

कोपरगाव : अगोदरच नगर जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांची वाट लागलेली आहे. त्यातच पावसाळ्यामुळे अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. या सर्वच रस्त्यांवरून जातांना बसेसचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे सर्वच बसेसच्या मेंटेनन्समध्ये वाढ झाल्याने बसच्या फेऱ्या सुरू असताना उत्पन्नापेक्षा खर्चच वाढल्याने याचा थेट फटका एसटी महामंडळाला बसत आहे.

राज्यात अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा म्हणून आहे. या जिल्ह्यात जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र, ऐतिहासिक ठिकाणे, पर्यटन क्षेत्र, शैक्षणिक संस्था, साखर तसेच इतर कारखानदारी मोठ्या प्रमाणात आहे. या जिल्ह्यात एकूण १४ तालुके असून, ११ बस आगार आहेत. या सर्व आगारांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात महामंडळाच्या बसचे जाळे पसरलेले आहे.

कोरोनामुळे सर्वच आगारांच्या तालुकाअंतर्गत वाहतूक बंद आहे, तर तालुका ते इतर तालुका व जिल्हा अशी वाहतूक सुरू आहे. सध्या तारकपूर आगारातून वाहतूक सुरू असताना नगर - कोपरगाव, नगर - नाशिक, सोलापूर - पंढरपूर या रस्त्यांची पूर्णतः खड्ड्यामुळे चाळण झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या बसेसचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामध्ये पाट्याच्या स्प्रिंग तुटणे, गिअर बॉक्स व हाऊजिंगचा जॉईंट तुटणे, बाकडे, खिडक्या तुटणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बसची बॉडी खिळखिळी होणे, असे प्रकार वाढले आहेत. त्यातच कोरोनामुळे सुरू असलेल्या बसला अपेक्षित प्रवासीदेखील मिळत नाहीत. त्यामुळे उत्पन्न व तोटा यांचा मेळ लावताना आगारप्रमुखांची चांगलीच कसरत होत आहे.

.................

तारकपूर आगार एकूण गाड्या

बस - ७६

ट्रक - ८

.........

तारकपूर आगारातून सुरू असलेल्या बसचे मार्ग व फेऱ्या

नगर - शिर्डी ( धुळे, सुरत ) - ५

नगर - नाशिक - १०

नगर - कल्याण - १५

नगर - पुणे - १५

नगर - सोलापूर- ३

नगर - पंढरपूर - ६

नगर - गांडगापूर - १

.................

सध्या बसेस सुरू असलेले सर्वच रस्ते खूप खराब झाले आहेत. त्यामुळे बसेसच्या स्पेअरपार्टसह विविध नुकसानीचे प्रमाण वाढले आहे. त्यातच प्रवासी संख्या कमी झाली आहे. त्यामुळे सध्यातरी उत्पन्नापेक्षा खर्चाच्या बाजू वाढल्या आहेत.

- अभिजित आघाव, आगार व्यवस्थापक, तारकपूर.

---------------

स्टार ११४१