याप्रसंगी जिल्हा निसर्गप्रेमी संस्थेचे अध्यक्ष पक्षिप्रेमी जयराम सातपुते, शिल्पकार प्रमोद कांबळे, वन्यछायाचित्रकार राजेश परदेशी, साईबनचे संचालक डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. सुधा कांकरिया, आर्किटेक्ट किरण कांकरिया, ज्योती कांकरिया आदी उपस्थित होते. ‘लहानपणापासून प्राण्यांवर प्रेम करा’ अशी शिकवण नेहमी दिली जाते. परंतु, वाढत्या शहरीकरणामुळे, फ्लॅट संस्कृतीमुळे लोकांना व विशेषत: लहान मुलांना प्राण्यांचा सहवास लाभत नाही. केवळ पुस्तकात चित्रे पाहून समाधान मानावे लागते. मुलांना ससे, बदक, कोंबड्या, मेंढ्या, बकऱ्या, गायीचे वासरू, घोड्याचे पिल्लू यांना आपल्या हाताने स्पर्श करता यावा, लाड करता यावे व त्यांना आपल्या हाताने खाऊ घालता यावे. त्यामुळे लहान मुलांमध्ये प्राणीप्रेम निर्माण व्हावे व जिज्ञासाही पूर्ण होईल, या हेतूने साईबनमध्ये हे दालन सुरू करण्यात आले आहे. (वा.प्र.)
-----------
फोटो - २२साईबन फोटो