आमदार कानडे म्हणाले, मतदारसंघामध्ये आपण रस्त्यांच्या कामांचे मोठे जाळे निर्माण केले आहे. तालुक्यातील एमआयडीसीच्या विकासाकरिता दळवळणाची साधने उपलब्ध करून देत आहोत. त्याचाच भाग म्हणून बाभळेश्वर फाटा ते नेवासे फाटा या १३७ कोटी रुपयांच्या महामार्गाचे काम हाती घेतले आहे. मात्र केवळ रस्ते उभारणी एवढ्यापुरतेच काम मर्यादित ठेवायचे नाही, तर सर्वच क्षेत्रामध्ये सर्वांगीण विकास हाती घ्यायचा आहे. कोणताही गरीब माणूस उपचारांविना राहू नये याची खबरदारी घेण्यात आली आहे. त्याकरिता उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये दीडशे बेड्सचे विस्तारीकरण केले जात आहे.
सूत्रसंचालन समीन बागवान यांनी केले. जिल्हा परिषद सदस्या मंगला पवार, राजेंद्र पाऊलबुद्धे, सुधीर नवले, राम काळे, पद्मा भोसले, भाऊसाहेब कांदळकर, विजय शिंदे, विद्या दाभाडे, विष्णुपंत खंडागळे, कार्लस साठे, सरपंच सागर मुठे, लहानू दळे, आशा चक्रनारायण, दत्तात्रय आदिक उपस्थित होते.
-------