शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
3
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
4
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
5
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
6
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
7
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
8
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
9
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
10
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
11
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
12
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
13
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
14
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
15
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
16
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
17
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
18
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
19
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
20
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

अहिल्यानगरमध्येही ‘मस्साजोग’; गटाराच्या चेंबरमध्ये कोंबून तरुणाची अमानुष हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 05:25 IST

याप्रकरणी अटक केलेल्या नऊ आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर : बीडमधील मस्साजोगची घटना ताजी असतानाच अहिल्यानगरमध्ये दोन तरुणांना गटाराच्या चेंबरमध्ये कोंबून अमानुष मारहाण करण्यात आली. यात एकाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह डोंगरात नेऊन जाळून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अटक केलेल्या नऊ आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

वैभव ऊर्फ सोन्या नायकोडी (१९, रा. ढवणवस्ती, अहिल्यानगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता त्याचे अपहरण केले होते. त्यापूर्वी २१ फेब्रुवारी रोजी आरोपींनी संदेश भागाजी वाळूंज ऊर्फ गोट्या (वय १९, रा. नवनागापूर, एमआयडीसी) याचेही अपहरण केले होते.

संदेशला त्याच्या घरून कारमध्ये घालून बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर एका निर्जनस्थळी नेऊन नवीन ले-आउटमध्ये गटारीसाठी केलेल्या चेम्बरमध्ये कोंबून मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ आरोपींनी काढला. तेथून त्याला नागापूर येथील एका फ्लॅटमध्ये रात्रभर डांबून ठेवले. दुसऱ्या दिवशी म्हणजे २२ फेब्रुवारीला संदेश याच्या मोबाइलवर वैभव नायकोडीचा संदेश आला, म्हणून आरोपींनी संदेशला वैभव नायकोडी यास फोन करण्यास सांगितले. संदेशने वैभवला फोन करून तपोवन रोडवरील एका रुग्णालयाजवळ बोलविले. 

आरोपींनी संदेशच्या डोळ्यावर पट्टी बांधून वैभव ज्या सलूनच्या दुकानावर थांबला होता तेथे नेले. नायकोडीची ओळख पटवली. त्यानंतर आरोपींनी दोघांना पुन्हा निर्जनस्थळी नेत चेम्बरमध्ये घालून मारहाण केली. त्या रात्री दोघांनाही फ्लॅटमध्ये डांबले. तेथे आरोपींनी त्यांना मॅगी खाण्यास दिली. संदेशने मॅगी खाल्ली, पण वैभवने नकार दिला. म्हणून, त्यास पुन्हा मारहाण केली. दुसऱ्या दिवशी पहाटे वैभवला आरोपींनी उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो उठत नव्हता. तो मयत झाल्याचे लक्षात येताच त्याचा मृतदेह मनमाड रोडवरील केकताईच्या डोंगरात नेत जाळून टाकला. त्यानंतर आरोपींनी संदेशला घडल्या प्रकाराबाबत कोठे न बोलण्याची धमकी देत सोडले. वैभवच्या खुनाची घटना उघड झाल्यानंतर संदेशने पोलिसांत येत ही सर्व हकीगत सांगितली आहे.

हत्या का केली?

तरुणांच्या दोन टोळ्यांमध्ये वाद आहेत. गत १९ जानेवारीला आरोपी अनिकेत सोमवंशी याच्यावर एक अल्पवयीन मुलगा व त्याच्या इतर पाच साथीदारांनी कोयत्याने वार केले होते. मयत वैभव नायकोडी व संदेश हे दोघे सोमवंशीला मारहाण करणाऱ्या टोळीसोबत राहतात, या रागातून त्यांचे अपहरण केले होते.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी