शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपूल मार्गावरील रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:15 IST

अहमदनगर : नगर शहरामध्‍ये हॉटेल अशोका ते सक्‍कर चौक या रस्‍त्‍यावर उड्डाणपुलाचे काम सुरू असून, या मार्गावरील दोन्ही बाजूच्या ...

अहमदनगर : नगर शहरामध्‍ये हॉटेल अशोका ते सक्‍कर चौक या रस्‍त्‍यावर उड्डाणपुलाचे काम सुरू असून, या मार्गावरील दोन्ही बाजूच्या रस्त्यांवर माती पडलेली आहे, तसेच अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे अपघात होत असून, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी महापालिका स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे.

स्थायी समिती सभापती घुले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोठी रस्‍त्‍यालगत जलवाहिनी स्थलांतरीत करण्याचे काम सुरू आहे. सदर भाग काळ्या मातीचा आहे. त्यामुळे रस्ता ठिकठिकाणी खचला आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत, तसेच पुलाच्या कामाची माती रस्‍त्‍यालगत टाकल्‍यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नुकताच एका तरुणाला जीव गमवावा लागला. सध्‍या पावसाचे दिवस सुरू असून, काळी माती रस्‍त्‍यावर येवून रस्‍ता निसरडा झाला आहे. शहरातील अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्‍यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची ये- जा सुरू झाली आहे, तसेच अवजड वाहतूकही मोठ्या प्रमाणात होत असल्‍यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. रस्‍त्‍यावर पडलेली माती उचलावी. खड्डे बुजवावेत. रस्‍त्‍याचे मजबुतीकरण करावे. आवश्‍यक त्‍या उपाययोजना कराव्‍यात, जेणे करून अपघात होणार नाही, याची काळजी घ्‍यावी, अपघात झाल्‍यास त्‍याची सर्वस्‍वी जबाबदारी राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांची राहील, असे घुले यांनी निवेदनात म्हटले आहे.