यावेळी जगताप म्हणाले की, समाजात वावरत असताना चांगले संस्कार आवश्यक असतात आणि ते संस्कार फक्त आई-वडिलांनंतर आपल्याला शिक्षकांकडून मिळतात. त्यामुळे त्यांचा सन्मान करणे म्हणजे आपले एक कर्तव्य आहे. टेमकर म्हणाले की, शिक्षकांचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळेच आज आम्ही आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून हा पुरस्कार सोहळा आयोजित केला. आशा मगर यांचे शिक्षण क्षेत्रातील २७ वर्षांचे उत्कृष्ट कार्य, तसेच विभावरी रोकडे यांची शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट २९ वर्षांची सेवा पाहून हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, शिक्षक नेते सुनील गाडगे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, जितेंद्र आरू, महेश पाडेकर, आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
----------
फोटो - ०७आशा मगर, विभावरी रोकडे