शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

मघा बरसल्या; खरीपाला दिलासा

By admin | Updated: August 21, 2014 23:05 IST

पावसाने जिल्ह्यात हजेरी लावत सुखद धक्का दिला आहे़ जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहुरी आणि शेवगाव वगळता इतर ठिकाणी दिवसभरात कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला.

अहमदनगर : शहरासह जिल्ह्यात पावसाचे गुरूवारी पुनर्रागमन झाले़ अनुकूल वातावरण असूनही पाऊस पडत नव्हता़ पावसाने ओढ दिल्याने बळीराजा चांगलाच धास्तावला होता़ मात्र पावसाने जिल्ह्यात हजेरी लावत सुखद धक्का दिला आहे़ जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहुरी आणि शेवगाव वगळता इतर ठिकाणी दिवसभरात कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला.शिर्डीत जोरदार पाऊसशिर्डी शहरात दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली़ त्यामुळे परिसरातील खरीप पिकांना दिलासा मिळाला असून, शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे़कोपरगाव तालुक्यात पाऊसकोपरगाव शहरात पाऊस झाला नाही़ मात्र तालुक्यातील कोळपेवाडी, पुणतांबा, वारी, मायगाव देशमुख, सुरेगाव, परिसरातही पाऊस पडला़एकतास झालेल्या पावसाने सखल भागातून पाणी वाहिले़ पावसाने उशिराने का होईना पण हजेरी लावल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे़राहाता तालुक्यात दिलासाराहाता तालुक्यात पावसाने गुरुवारी हजेरी लावली़ तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडला आहे़ पावसामुळे खरीप पिकांना काहीसा दिलासा मिळाला़ दिवसभर तालुक्यात ढगाळ वातावरण होते़नगर तालुका सुखावलासर्वाधिक टंचाईची स्थिती नगर तालुक्यात निर्माण झाली आहे़ हा तालुका टंचाईग्रस्त जाहीर करण्याची मागणी जोर धरत असतानाच नगर तालुका परिसरातही पावसाने गुरुवारी जोरदार हजेरी लावली़ बुधवारीही या परिसरात पाऊस पडला असून, दुसऱ्या दिवशी गुरुवारी नगर तालुक्यांत बहुतांश ठिकाणी पाऊस झाला़ त्यामुळे आता रब्बीच्या पिकाची शेतकऱ्यांनी तयारी सुरु केली आहे.पारनेर तालुक्यात पाऊसतालुक्यात अत्याल्प पाऊस झाल्याने टंचाई सदृष्य तालुक्यांत या तालुक्याचा समावेश झाला आहे़ दीड महिन्यांपासून परिसरात पाऊस झाला नाही़ मात्र गुरुवारी पावसाचे आगमन झाले असून, कान्हूर, पानेरी आदी गावांत पाऊस पडला़ तिसगाव परिसरात पाऊसतालुक्यात अत्यंत कमी पाऊस पडला़ त्यामुळे परिसरात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे़ तालुक्यातील तिसगाव परिसरात दुपारी सुमारे एकतास जोरदार पाऊस झाला़ त्यामुळे परिसरातील शेती पिकांना दिलासा मिळाला असून, शेतकरी सुखावला आहे़जामखेडमध्ये हलक्या सरीसायंकाळी आकाशात काळे ढग दाटून आले़ सोसाट्याच्या वाऱ्यासह सायंकाळी जामखेड शहरासह खर्डा, पाडळी, नायगाव, राजूरी, आनंदवाडी, रत्नापूर,पाटोदा आदी परिसरात पाऊस झाला़ या पावसाने खरीप पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे़नेवासा तालुक्यात काही ठिकाणी पाऊसगेल्या दीड महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाचे पुनर्गामन झाले आहे़ बुधवारी सकाळीच काही भागात पाऊस झाला असून, गुरुवारीही काही ठिकाणी पाऊस पडला़ त्यामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे़श्रीगोंद्यात मध्यम पाऊसतालुक्यातील घारगाव परिसरात दुपारी ३ वाजेच्या सुमारास मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला़ उशिरा का होईना पण पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे़ (प्रतिनिधी)