पिंपळगाव वाघा येथील शिबिरात शंभर जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:19 IST2021-07-25T04:19:48+5:302021-07-25T04:19:48+5:30

अहमदनगर : तालुक्यातील पिंपळगाव वाघा येथील श्रीमद् आद्य जगद्गुरू शंकराचार्य विश्वात्मक श्री वारकरी पीठ यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आयाेजित केेलेल्या रक्तदान ...

Hundreds of people donated blood in the camp at Pimpalgaon Wagah | पिंपळगाव वाघा येथील शिबिरात शंभर जणांचे रक्तदान

पिंपळगाव वाघा येथील शिबिरात शंभर जणांचे रक्तदान

अहमदनगर : तालुक्यातील पिंपळगाव वाघा येथील श्रीमद् आद्य जगद्गुरू शंकराचार्य विश्वात्मक श्री वारकरी पीठ यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आयाेजित केेलेल्या रक्तदान शिबिरात शंभर जणांनी रक्तदान केले.

रक्तदान म्हणजे जीवनदान, असे अध्यक्ष डॉ. विकासानंद महाराज मिसाळ यांनी कीर्तनातून सांगितले. रक्तदानाच्या आवाहनाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरासाठी नगर येथील अष्टविनायक रक्तपेढीचे डॉ. पाटणकर, डॉक्टर, नर्सेसचे सहकार्यल लाभले. सकाळी १० ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत चाललेल्या शिबिरात नगर, पुणे, नाशिक जिल्ह्यातील १०० रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना श्री वारकरी संतपीठाकडून सन्मानपत्र देण्यात आले. रक्तपेढीकडून श्री वारकरी पीठास सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले. संतपीठचे ट्रस्ट सदस्य राजाराम पटाडे यांनी रक्तदाते, डॉक्टर, नर्सेस यांचे आभार मानले.

---

२४पिंपळगाव वाघा

पिंपळगाव वाघा येथील शिबिरात रक्तदान करताना रक्तदाते.

Web Title: Hundreds of people donated blood in the camp at Pimpalgaon Wagah