साई पुण्यतिथीला लाखोंची हजेरी

By Admin | Updated: October 3, 2014 23:56 IST2014-10-03T23:56:32+5:302014-10-03T23:56:32+5:30

शिर्डी: शुक्रवारी लाखाहून अधिक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला़

Hundreds of millions of devotees of Sai Puniyatithithi | साई पुण्यतिथीला लाखोंची हजेरी

साई पुण्यतिथीला लाखोंची हजेरी

शिर्डी: सार्इंच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून पारंपरिक भिक्षा झोळीच्या निमित्ताने शुक्रवारी साईच आपल्या दारी भिक्षेसाठी अवतरले या श्रद्धेतून शहरातील ग्रामस्थ व भाविकांनी पाऊणशे पोती धान्य व एकोणसाठ हजाराच्या रकमेचे दान भिक्षा झोळीत टाकले़ शुक्रवारी लाखाहून अधिक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला़
त्रिसदस्यीय समितीचे सदस्य जिल्हाधिकारी अनिल कवडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र जाधव, उपकार्यकारी अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांच्यासह अनेक उच्चपदस्थ आपले पद, प्रतिष्ठा विसरुन आत्मिक आनंद मिळवून देणाऱ्या व अहंकार गळून पाडणाऱ्या या कार्यक्रमात भिक्षा झोळी घेवून सहभागी झाले होते़ पहाटे साईप्रतिमेच्या व साईसच्चरित्र ग्रंथाच्या मिरवणुकीने उत्सवाच्या मुख्य दिवसाचा श्रीगणेशा झाला़द्वारकामाईत सुरू झालेल्या अखंड पारायण सोहळ्याची सांगता झाली़ यानंतर भिक्षा झोळीचा तर माध्यान्हीला जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते आराधना विधीचा कार्यक्रम संपन्न झाला़दुपारी ह़भ़प़मनोहर दिक्षित यांच्या कीर्तनाबरोबरच सायंकाळी खंडोबा मंदिरात सीमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पडला़या कार्यक्रमांना भाविकांसह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली़
साईबाबांच्या पुण्यतिथी निमित्त साईनगरी नटली आहे़विविधरंगी फुलांनी सजवलेली,सुवर्णालंकाराने नटलेली,चित्ताकर्षक वस्त्रांनी लपेटलेली सार्इंची समाधीवरील मनमोहक मूर्ती भाविकांचे भान हरपवणारी होती़
रात्री साडेसात ते दहा वाजेपर्यंत सत्यनारायण नायर,भोपाल यांचा साईभजन संध्येचा कार्यकम झाला तर रात्री नऊ वाजता शहरातून सार्इंची सुवर्ण रथातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली़ दानशूर साईभक्तांच्या देणगीतून प्रसादालयात भाविकांना मोफत मिष्टान्न भोजन देण्यात आले़ मंदिर रात्रभर भाविकांच्या दर्शनासाठी उघडे ठेवण्यात आले होते़
शनिवारी सकाळी गुरूस्थान मंदिरातील रूद्राभिषेकानंतर दहा वाजता ह़भ़प़मनोहर दीक्षित यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता होईल़ (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Hundreds of millions of devotees of Sai Puniyatithithi