शहरं
Join us  
Trending Stories
1
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
2
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
3
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
4
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
5
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
6
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
7
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
8
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
9
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
10
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
11
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
12
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
13
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
14
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
15
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
16
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
17
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
18
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
19
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
20
Mother's Day 2026 Wishes: जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मातृत्त्वाचा सोहळा
Daily Top 2Weekly Top 5

पूरक पोषण आहार तेलाशिवाय शिजवणार कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क संगमनेर : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील ६ महिने ते ३ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

संगमनेर : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील ६ महिने ते ३ वर्ष वयोगटातील बालके, गरोदर स्त्रिया-स्तनदा माता व किशोरवयीन मुली, कुपोषित बालके तसेच ३ ते ६ वर्ष वयोगटातील बालकांना सध्या पुरवठा करत असलेल्या पाककृतींमध्ये (पूरक पोषण आहारात) बदल करण्यात आला आहे. काही महिन्यांपासून तेल कमी करून त्याऐवजी साखर देण्यात येते आहे. त्यामुळे मिळालेला पूरक पोषण आहार तेलाशिवाय शिजवणार कसा? असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे.

राज्यात कोरोनाची साथ असल्याने अंगणवाडीमधील बालकांना कोरोनाची लागण होऊ नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून राज्यातील अंगणवाडीतील ३ ते ६ वर्ष वयोगटातील बालकांना गरम ताज्या आहाराऐवजी घरपोच आहार व किराणा मालाचा पुरवठा करण्यात येतो आहे. मात्र, सध्या लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पूरक पोषण आहारातून तेलाचा पुरवठा कमी करण्यात आला आहे. त्याऐवजी साखर देण्यात येते आहे. मटकी, चना, मूग दाळ, गहू, मिरची पावडर, हळदी पावडर, मीठ, साखर असा पूरक पोषण आहार देण्यात येतो आहे. पूर्वी पूरक पोषण आहारात तेलाचा समावेश असायचा. सध्या लाभार्थ्यांना मिळणाऱ्या पूरक पोषण आहारात तेल मिळत नाही. महागाई बरोबरच तेलाचे भाव देखील दिवसेंदिवस वाढत आहेत. मिळणारा आहार शिजवणार कसा? त्यामुळे पुन्हा तेल देणे सुरू करावे, अशी मागणी लाभार्थ्यांकडून होते आहे.

-----------

मुले खाण्याचा कंटाळा करतील, कुपोषण वाढेल

बालकांच्या कुपोषण निर्मूलनाची जबाबदारी महाराष्ट्र शासनावर आहे. शालेय पोषण आहार तसेच एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या वतीने कुपोषण निर्मूलन कार्यक्रम राबवला जातो. त्यामुळे शून्य ते सहा या वयोगटातील मुले, स्तनदा माता आणि गरोदर स्त्रियांच्या कुपोषण निर्मूलनासाठी मदत होते. या आहारात डाळ, तांदूळ, कडधान्य, तेल इत्यादी दिले जाते. आता तेलाऐवजी साखर देत असल्याचे समजले. तेल नसेल तर आहारात रुची येणार नाही. तेलातील पदार्थांमुळे मुलांना विविध चवीचे पदार्थ खाता येतात. मुलांची हाडे बळकट होतात. साखरेमुळे केवळ गोड पदार्थ बनवता येईल. रोज गोड कोणालाच आवडत नाही. मुले खाण्याचा कंटाळा करतील, कुपोषण वाढेल. साखरेचे आहारातील प्रमाण मर्यादित असावे, लहान मुलांना साखर देऊ नये, असे आहार शास्त्र सांगते. तरी मुलांचे आरोग्य आणि कुपोषण निर्मूलनासाठी पूर्वीप्रमाणे योग्य तेल द्यावे.

ॲड. निशा शिवूरकर, प्रदेशाध्यक्षा, अंगणवाडी कर्मचारी सभा, महाराष्ट्र राज्य

--------

अंगणवाडीतील लाभार्थ्यांसाठी प्रतिदिन प्रती लाभार्थी जे अनुदान निश्चित केले आहे. सर्वसाधारण त्या अनुदानामध्ये ५०० ते ५५० उष्मांक आणि २० ते २२ ग्रॅम प्रथिने मिळणे गरजेचे आहे. त्यानुसार अनुदानाला अधिन राहून काेणत्या घटक पदार्थांचा समावेश आहारात करायचा हे सर्वस्वी शासनाच्या निर्णयावर आधारित आहे.

वैशाली कुकडे, बालविकास प्रकल्प अधिकारी, घारगाव १, ता. संगमनेर

---------

एकात्मिक बालविकास सेवा योजना लाभार्थी (संगमनेर तालुका)

अ. नं. संगमनेर घारगाव १ घारगाव २

गरोदर ८३५ १३२३ १०१६

स्तनदा माता ८१७ १२६२ १०२८

६ महिने ते ३ वर्ष बालके ४०२८ ५९५७ ६०४४

३ ते ६ वर्ष ५१४५ ५९४४ ६१६२

-------

एकूण १०८२५ १४४८६ १४२५०

-----------

असा आहे पूरक पोषण आहार

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत ६ महिने ते ३ वर्ष वयोगटातील लाभार्थी, गरोदर स्त्रिया व स्तनदा माता, ६ महिने ते ६ वर्ष वयोगटातील लाभार्थी, ३ ते ६ वर्ष वयोगटातील लाभार्थी यांना चना, मटकी, मूग दाळ, मसूर डाळ, गहू, मिरची पावडर, हळद पावडर, मीठ, साखर असा पूरक पोषण आहार सध्या देण्यात येतो आहे.

...........771.............