टाकळी खातगाव येथील आरोग्य कर्मचाऱ्याचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:20 IST2021-05-15T04:20:08+5:302021-05-15T04:20:08+5:30

निंबळक : पंचायत समिती उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी खातगाव (ता. नगर) येथे भेट ...

Honoring the health worker at Takli Khatgaon | टाकळी खातगाव येथील आरोग्य कर्मचाऱ्याचा सन्मान

टाकळी खातगाव येथील आरोग्य कर्मचाऱ्याचा सन्मान

निंबळक : पंचायत समिती उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी खातगाव (ता. नगर) येथे भेट दिली. कोविड-१९ संदर्भात कामाची पाहणी व माहिती घेतली. येथील कर्मचाऱ्यांचे कोविड काळात सुरू असलेल्या कामाचे कौतुक करून येथील आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले. तसेच आरोग्य केंद्रातील कोविड तपासणी व लसीकरण सत्राची माहिती घेतली. कोविडची लक्षणे असणाऱ्या रुग्णांची तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ गणेश महाजन यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली व सत्कार केला. मागील वर्षापासून महाजन यांनी आरोग्य केंद्रात चांगल्या प्रकारे सेवा दिल्याबद्दल उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी त्यांचा सन्मान केला. याप्रसंगी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका पवार, औषधनिर्माण अधिकारी, आरोग्य साहाय्यक व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Honoring the health worker at Takli Khatgaon