शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंचा इतिहास कच्चा

By admin | Updated: October 9, 2014 00:11 IST

अहमदनगर : शिवाजी महाराज शिवसेनेची खासगी प्रॉपर्टी नाही, असा टोला भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता मारला.

अहमदनगर : अफजलखान महाराष्ट्रात दिल्लीहून नाही तर विजापूरहून आला होता. जरा इतिहास नीट माहिती करून घ्या. आम्हाला अफजलखान म्हणता पण त्याच अफजलखानाबरोबर २५ वर्षे कसे राहिलात? शिवाजी महाराज शिवसेनेची खासगी प्रॉपर्टी नाही, असा टोला भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता मारला.वाळकी (ता.नगर) येथे श्रीगोंदा मतदारसंघाचे भाजपा व मित्र पक्षाचे उमेदवार बबनराव पाचपुते यांच्या प्रचारसभेत खडसे बोलत होते. यावेळी खा.दिलीप गांधी, आ.शिवाजी कर्डिले, बाबासाहेब भोस, डी. डी. घोरपडे, कुंडलीक दरेकर, दादाभाऊ चितळकर, राजेंद्र म्हस्के आदी उपस्थित होते. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील भाजपावर टीका करताना अफजलखान दिल्लीहून महाराष्ट्रात येत असल्याची टीका केली होती. त्याला उत्तर देताना खडसे म्हणाले की, जे शिवाजी महाराजांच्या नावावर मते मागतात, त्यांना महाराजांचा इतिहासही माहिती असू नये. अफजलखान दिल्लीहून नाही तर विजापूरवरून महाराष्ट्रात आला होता आणि शिवाजी महाराज काय शिवसेनेची खासगी प्रॉपर्टी नाही. महाराजांबद्दलची अस्मिता भाजपाने जितकी जपली तितकी या देशात कुणीच जपली नाही. सहारा विमानतळाला व व्हिक्टोरिया टर्मिनसला महाराजांचे नाव तसेच संसदेच्या आवारात महाराजांचा पुतळा, महाराजांचे नाणे ही सर्व कामे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात झाली. महाराजांचा गौरव करण्यात भाजपाशिवाय दुसरा कुणी पुढे आला नाही. खडसे पुढे म्हणाले की, कुकडीचे पाणी आम्हीच आणले. टँकरमुक्त महाराष्ट्रासाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आम्हीच पूर्ण केल्या. राज्यात भाजपाचे एकट्याचे सरकार येणार असल्याने साकळाई योजनेसाठी पुढाकार घेणार आहे. पाटबंधारे मंत्री असताना मीच साकळाईचा सर्वे केला होता. त्याचे काम भाजपाचे सरकार आल्यानंतर पूर्ण करणार असल्याची घोषणा खडसे यांनी केली. यावेळी रमेश भामरे, भाऊसाहेब बोठे, दिलीप भालसिंग, उमेश कासार आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)