शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
2
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
3
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
4
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
5
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
6
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
7
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
8
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
9
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
10
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
11
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
12
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
13
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
14
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
15
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
16
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
17
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
18
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
19
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
20
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य भरती स्थगित झाल्याने इच्छुकांचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:16 IST

अहमदनगर : पुढील महिन्यात होणारी आरोग्य भरती राज्य शासनाकडून अचानक स्थगित झाल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. नगर जिल्हा ...

अहमदनगर : पुढील महिन्यात होणारी आरोग्य भरती राज्य शासनाकडून अचानक स्थगित झाल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. नगर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात सुमारे साडेपाचशे जागांची भरती होणार आहे. मात्र, ही भरती स्थगित झाल्याने आता शासनाच्या पुढील आदेशाची प्रतीक्षा उमेदवारांना लागली आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तोकडी पडणारी आरोग्यसेवा भरून काढण्यासाठी शासनाने नुकत्याच राज्यात साडेआठ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जागा भरण्याचे जाहीर केले. यासाठी नवीन अर्ज मागविण्यात येणार नसून मार्च २०१९ मध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीप्रमाणे ज्या उमेदवारांनी अर्ज केले त्यांनाच संधी मिळणार आहे. त्यावेळी १८ संवर्गाच्या जागा होत्या. आता तूर्तास केवळ आरोग्य विभागाच्या पाच संवर्गासाठी रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेच्या मार्गदर्शक सूचना दि. १४ जून रोजी ग्रामविकास विभागाने दिल्या आहेत. त्यानुसार आरोग्य पर्यवेक्षक, औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविका या पदांच्या भरतीसाठी ७ आणि ८ ऑगस्टला लेखी परीक्षा घेण्यात येणार होती; परंतु जूनअखेर पुन्हा आदेश काढून शासनाने ही भरती पुढील आदेश येईपर्यंत स्थगित ठेवल्याने इच्छुकांचा भ्रमनिराश झाला आहे.

नगर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात १३ औषधनिर्माता, ३ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, २०६ आरोग्यसेवक (पुरुष) व ३५२ आरोग्यसेविका (महिला) अशा सुमारे साडेपाचशेहून अधिक जागा भरायच्या आहेत; परंतु भरतीबाबत पुढील आदेश येत नसल्याने आधीच दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या उमेदवारांची प्रतीक्षा आणखी वाढली आहे.

---------

केवळ अपंगांना करता येणार अर्ज

२०१९च्या भरतीमध्ये अपंगांना ३ टक्के जागा राखीव होत्या; परंतु या जागा वाढवून मिळाव्यात म्हणून न्याप्रविष्ट झालेल्या या प्रकरणात पुढे न्यायालयाने ४ टक्के जागांचा समावेश करण्याचा आदेश दिल्याने आता ४ टक्क्यांप्रमाणे केवळ अपंगांच्या जागांसाठी जाहिरात देण्यात येणार आहे. त्यामुळे अपंगांनाच नव्याने अर्ज करता येतील. इतर उमेदवार मात्र २०१९च्या भरती प्रक्रियेतील असणार आहेत.

-----------